• 20 of March 2018, at 7.22 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

तूर घोटाळ्यात गुन्हे दाखल नाही झाल्यास २५ जानेवारी पासून अर्धनग्न उपोषण

तूर घोटाळ्यात गुन्हे दाखल नाही झाल्यास २५ जानेवारी पासून अर्धनग्न उपोषण

लातूर: लातूर जिल्ह्यातील खरेदी केद्रांवरील तूर खरेदी व आडत बाजारातील हमी भावापेक्षा कमी दराने झालेल्या तूर खरेदी घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास २५ जानेवारीपासून शहरातील गांधीयांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषण करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या अंजनवादी आंदोलनाचे राज्य समन्वयक लक्ष्मण वंदे यांनी गुरूवारी जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. लातूर जिल्ह्यात गतवर्षी हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करीन शेतकर्‍यांची प्रतिक्विंटल १ ते दीड हजारां लूट केली. शिवाय खारेदी केद्रांवरही तूर खरेदी करताना अतिरिक्त ५०० ते ७०० ग्रॅम तूर घेऊन शेतकर्‍यांची लूट केली. यातून कोट्यावधी रुपयांची लूट शेतकर्‍यांची करण्यात आलीअसून याप्रकरणातील सर्व दोषींवर तात्काळ गुन्हे दाखाल करावेत अशी मागणी वंगेयांनी केली आहे. या प्रकरणाचा पाठ्पुरावा करून ८ ते १० महिने होत असताना आणि या प्रकरणाचे गांभिर्य असताना प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप वंगेयांनी केला आहे. शासनाच्या तिजोरीवर डल्लामारून शासनाची लूट करण्यात आल्याचे निष्पन्न होऊनही कारवाई होत नाही. यातून प्रशासनाची दिरंगाई स्पष्ट होते. याप्रकरणातील तात्काळ गुन्हे दाखल नाही केल्यास संबधीत खरेदीदार व्यापार्‍यांचे परवाने तात्काळ रद्द न केल्यास २५ जानेवारीपासून गांधीपुतळ्या समोर अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसू असा ईशारा वंगे यांनी निवेदनात दिला आहे.


Comments

Top