logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   लातूर न्यूज

‘वृक्ष लागवड’ लातूर मनपाच्‍या वतीने शनिवारी चर्चा सत्र

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ट्री बॅंकेची स्थापना

‘वृक्ष लागवड’ लातूर मनपाच्‍या वतीने शनिवारी चर्चा सत्र

लातूर: लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने ०७ जुलै शनिवारी दुपारी ०४.०० वाजता मनपाच्या सभागृहात ‘वृक्ष लागवड’ या विषयावर चर्चा सत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात शहरातील वृक्षप्रेमी, सेवाभावी संस्‍था, बॅंका, सर्व प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक, खाजगी शिकवणी संचालक व व्‍यापारी यांना निमंत्रित करण्यात येत आहे. चर्चासत्रात सहभाग नोंदवून राष्‍ट्रीय कार्यक्रमास गती देण्‍यास हातभार लावावा असे आवाहन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
‘एक विदयार्थी एक झाड’ ही संकल्‍पना राबविणार
लातूर शहर महानगरपालिकेला शासनाने सन २०१८-१९ साठी २५,८४२ झाडे लावण्‍याचे उदिष्‍ट दिलेले आहे. ही झाडे ०१ जुलै ते ३१ जुलै या ०१ महिन्‍याच्‍या कालावधीत लावण्‍यात येणार आहेत. ही झाडे अमृत ग्रीन स्‍पेस या योजनेअंतर्गत ३५ उदयानामध्‍ये व रस्‍त्‍याच्‍या बाजुने झाडे लावण्‍याचे नियोजन केले आहे. १४ वा वित्‍त आयोग या योजनेअंतर्गत शहरातील ६० मुख्‍य रस्‍त्‍यांवर (प्रत्‍येकी २५ झाडे ) लावण्‍यात येणार आहेत. या वृक्ष लागवडीमध्‍ये याद्वारे लातूर शहरातील नागरिक नामांकीत व्‍यापारी, शाळा, कॉलेज व सेवाभावी संस्‍था यांनी या कामात सहभाग घेवून जास्‍तीत जास्‍त झाडे लावावीत व त्‍याचे संवर्धन करावे. असे आवाहन करण्‍यात येत आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी नगरसेअकांमार्फत वृक्षरोपण करण्यात येणार आहे, ज्या होतकरु विद्यार्थ्‍यांना झाडे लावणे, संगोपन करणे याची आवड आहे अशा विद्यार्थ्‍यांना मनपा च्‍या वतीने मोफत झाडे देण्‍यात येणार आहेत. लातूर शहर महानगरपालिका ट्री बॅंक स्‍थापन करणार आहे. ज्‍या लोकांना झाडे लावण्‍याची व जोपासण्‍याची आवड असेत अशांनी या ट्री बॅंक मधून मोफत झाडे पुरवठा करण्‍याची सोय उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे. ट्री बॅंक क्षेत्रिय कार्यालय येथे करण्‍यात येणार आहे. सद्य स्थितीत लातूर शहरात अंदाजे एक लाख झाडे आहेत. पुढील ०५ वर्षात लातूर शहरात ही संख्या पाच लाखांवर नेण्याचे उदिष्‍ट आहे. सहा महिन्यांत सेवाभावी संस्‍थांनी लातूर शहरामध्ये ४,००० झाडे लावली आहेत. (उदा. चार पदरी रस्ता, रस्‍ता दुभाजक ) या वर्षी रिंग रोडला व राज्‍य महामार्गावर वड, पिंपळ व रेनट्री ची झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचे काम ०१ जुलै पासून सुरु झाले आहे.


Comments

Top