HOME   लातूर न्यूज

पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे उद्या लातुरात

मंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दौरा, देशमुख जाणार उस्मानाबादला, बनसोडे उदगीरला

पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे उद्या लातुरात

लातूर: राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख आणि राज्यमंत्री संजय बनसोडे उद्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत त्यांचा कार्यक्रम याप्रमाणे:
शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२० रोजी सकाळी साडेसहा वाजता रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन, बाभळगावकडे प्रयाण, सहा वाजून पन्नास मिनिटांनी बाभळगाव येथे आगमन व राखीव. साडेनऊ वाजता विलासबाग येथे राखीव. १० ते १२ दरम्यान अभ्यागतांच्या भेटी, दुपारी एक वाजता राखीव. दुपारी दोन वाजता मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण.
संजय बनसोडे यांचा दौरा
राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे कार्यक्रम याप्रमाणे:
१० जानेवारी रोजी रात्री उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण, रात्री नऊ वाजता विश्रामगृह, औसा रोड, लातूर येथे आगमन, राखीव व मुक्काम. शनिवार ११ रोजी सकाळी दहा वाजता शासकीय वाहनाने उदगीरकडे प्रयाण, मतदार संघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती, पशुपक्षी प्रदर्शन उदगीर येथे उपस्थिती. सोयीनुसार वाहनाने लातूरकडे प्रयाण व विश्रामगृह लातूर येथे राखीव व मुक्काम. रविवार १२ जानेवारी रात्री साडे दहा वाजता रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.


Comments

Top