logo
news image नांदेड मार्गावरील सरकारी गोदामम चोरट्यांनी फोडले, २८ हजारांचा ऐवज गायब news image ०१ मे रोजी लातूर मनपाच्या स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त, भाजपाचे सहा, कॉंग्रेसचे दोन news image लातुरच्या गंजगोलाईतील पहविक्रेत्यांचा अहवाल मागवला आयुक्तांनी news image उदगीर तालुक्यातील १५ जलसाठे कोरडे, ४० गावात टंचाई news image सचिन तेंडुलकरचं ४७ व्या वर्षात पदार्पण, शतकांचा शतकवीर, जगभर नाव news image देशात मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा होऊ शकतो, शरद पवारांचं मत news image १५ राज्यात ६४.६६ टक्के मतदान news image महाराष्ट्रात १४ मतदारसंघात झालं मतदान news image पुण्यात सर्वात कमी मतदान, सर्वाधिक मतदान झाले कोल्हापुरात news image राहूल गांधी म्हणतात अमित शाह हत्येचे आरोपी news image वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना वॉरंट news image अनंतनागमधील ४० मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही news image पंतप्रधान हा कुठल्याही एका धर्माचा असू शकत नाही- शरद पवार news image अभिनेता अक्षयकुमारने घेतली पंतप्रधानांची भेट, मुलाखतही घेतली अराजकीय news image पंतप्रधानांना व्हायचं होतं सैनिक! news image हाफ चड्डीची फुल पॅंट झाली पण अक्कल नाही वाढली- धनंजय मुंडे

HOME   लातूर न्यूज

लातूर व औसा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे लतुरात प्रशिक्षण

लातूर व औसा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे लतुरात प्रशिक्षण

लातूर व औसा तालुक्यातील भाजपा

कार्यकर्त्यांचे आज लातूर येथे प्रशिक्षण शिबिर


लातूर,: लातूर ग्रामीण मतदार संघातील लातूर व औसा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर रविवार, दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 1 ते 5 या वेळेत अंबाजोगाई रोडवरील नवीन रेणापूर नाका येथील विष्णुदास मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबीराच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 या वेळेत ‘जनसंघ ते भाजपा’ या विषयावर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, दुसऱ्या सत्रात दुपारी 1 ते 2 या वेळेत केंद्र ‘सरकार व राज्य सरकार उपलब्धी’ या विषयावर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, तिसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 3 यावेळेत ‘आपला विचार व परिवार’ या विषयावर प्राचार्य जोगेंद्रसिंह बिसेन व चौथ्या सत्रात दुपारी 3 ते 4 यावेळेत ‘निवडणूक व्यवस्थापन व पूर्व तयारी’ या विषयावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. विजय क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार असून पाचव्या सत्रात 4 ते 5 या वेळेत ‘राजकीय सद्यास्थिती विश्लेषन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या प्रशिक्षण शिबीरास लातूर व औसा तालुक्यातील भाजपाचे सर्व बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन या शिबीराचे संयोजक तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत नागटिळक, विधानसभा प्रशिक्षण प्रमुख वसंत करमुडे, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, औसा तालुकाध्यक्ष सुर्यकांत शिंदे, युवा मोर्चाचे लातूर तालुका अध्यक्ष विजय जाधव, युवा मोर्चाचे औसा तालुकाध्यक्ष राजकिरण साठे यांनी केले आहे.


Comments

Top