logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   लातूर न्यूज

पालकमंत्री निलंगेकरांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

पालकमंत्री निलंगेकरांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

लातूर: पावसाच्या अवकृपेने यावर्षी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पीके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने तात्काळ सर्वे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
यावर्षी पुन्हा एकदा निसर्गाने अवकृपा दाखविलेली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील पीके संकटात आलेली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. एकंदरीतच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहण्यास मिळत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. निलंगा व औसा तालुक्यातील गावातील शिवारांना भेटी देऊन शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी केली. जाऊ, चलबुर्गा व उत्का या गावांना भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची पाहणी पालकमंत्री निलंगेकर यांच्याकडून करण्यात आली. या पाहणीदरम्यान शेतकर्‍यांनी पालकमंत्री निलंगेकरांकडे आपल्या व्यथा मांडत आमच्यावर संकट कोसळले असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी पालकमंत्री निलंगेकरांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यसरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असा विश्‍वास दिला.
या पाहणीदरम्यान उत्का येथे सार्वजनिक शेततळे करण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री निलंगेकरांनी कृषी अधिकार्‍यांना दिली. तसेच शेतकर्‍यांच्या पीकांसह दुष्काळसदृश्य परिस्थितीचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल देण्यात यावा, असे निर्देश दिले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष आलसे, नाबदे, निलंग्याचे उपजिल्हाधिकारी विकास माने, तहसिलदार विक्रम देशमुख, औशाच्या तहसिलदार शोभा पुजारी यांच्यासह किरण उटगे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top