HOME   लातूर न्यूज

जात, धर्म के बंधन तोडो, भाषावाद-प्रांतवाद छोडो, भारत जोडो

राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात डॉ. एसएन सुब्बाराव यांचे आवाहन

जात, धर्म के बंधन तोडो, भाषावाद-प्रांतवाद छोडो, भारत जोडो

लातूर: लातूर भारतात अनेक जात, धर्म, पंथ आहेत विविध प्रांत, भाषा आहेत यांचे कोणतेही बंधन भेदभाव न करता एक ही नारा प्यारा भारत देश हमारा असे मानून सर्वांनी भारत जोडो ही भावना जोपासली पाहिजे असे आवाहन डॉ. एस.एन.सुब्बाराव यांनी भारत की संतान या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलतांना केले.
१९ वा राष्ट्रीय बाल आंनद महोत्सवाचे आयोजन विलासराव देशमुख फाऊंडेशन, गोल्डक्रेस्ट हाय व राष्ट्रीय युवा योजना नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ.एस.एन.सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली भारत की संतान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लातूर येथील राजर्षी शाहू महाविदयालय प्रागंणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रीडा संकूल ते राजर्षी शाहू महाविदयालय लातूर येथे राष्ट्रीय एकात्मता सदभावना रॅली काडण्यात आली. या रॅलीत विविध राज्यातून आलेले मुला-मुलीनी आपला राज्याची ओळख असलेला पेाशाख परिधान केला होता.
यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक राजेद्र माने, माजी प्राचार्य अनिरूध्द जाधव, विनायकराव पाटील आदींची प्रमुख उपसिथती होती.
यावेळी भारत की संतान या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध राज्यातून आलेल्या मुलांना आपल्या भाषेत जयघोष करावयला लावला. यावेळी आंध्रप्रदेश, बिहार, तामिळनाडु, मणिपूर, तेलंगणा, मिझोराम, केरळ, पंजाब, त्रिपूरा, उत्तर प्रदेश, महराष्ट्रसह विविध राज्यांतील चमूनीं आपल्या भाषेत ‘एक भारत, एक जनता, एक देश हमारा’ केलेला जयघोष ऐकून सर्वांनी एक भारतीयत्वाचा रोमांच अनुभवला. भारतातील विविध प्रातातील बोली भाषा, रितीरीवाज, संस्कृती, नृत्य व त्या राज्याची ओळख दर्शवणारी माहिती गीतातून सादरीकरण करण्यात आले. यातून देशातील राज्याची संस्कृतीची ओळख झाली. या कार्यक्रमाचे सादरीकरण डॉ.एस.एन.सुब्बाराव यांनी केले.
राष्ट्रीय एकात्मतेचा दिलेला संदेश मोलाचा
अमित विलासराव देशमुख आज भारताची सदयाची परिस्थिती पाहता भारत जोडो विचाराची गरज आहे. हा संदेश घेवून डॉ.एस.एन.सुब्बाराव आणि देशभरातील मुल-मुलीनी १९ व्या राष्ट्रीय बाल आंनद महोत्सवाच्या निमीत्ताने लातूरात आले आहेत. सदभावना रॅली व भारत की संतान कार्यक्रमातून त्यांनी दिलेला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मोलाचा आहे, तो आता आपण जपला पाहिजे असे उदगार महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना काढले.
यावेळी पूढे बोलतांना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आपण सर्वांनी ऐकमेकांचे मन आणि विचार एकत्र जोडून देशहितासाठी विचार करायला हवा. भारत जोडण्याचे काम करण्यासाठी आपण डॉ. एस.एन.सुब्बाराव यांच्या कार्याला हातभार लावावा लागेल. यामूळे देशातील एकात्मता टिकून राहिल असे सांगीतले. प्रारंभी लातूरमध्ये भारत जोडोचा संदेश घेवून १९ व्या राष्ट्रीय बाल आंनद महोत्सवनिमीत्ताने आलेल्या सर्वांचे लातूरकरांच्या वतीने त्यांनी स्वागत करून आभार मानले.
यावेळी प्राचार्य ए.के. कपूर, प्राचार्य बी.एस.वाकुरे, प्राचार्य तानाजी दाडगे, डॉ.सोमनाथ रोडे, माधव बावगे, डॉ. पवन लड्डा, सदाविजय आर्य, नरेंद्र दबडगावकर, धर्मराज हल्लाळे, सुपर्ण जगताप, संजय ओव्हाळ, डॉ.बी.आर.पाटील आदी संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.


Comments

Top