HOME   व्हिडिओ न्यूज

२६/११ ला मुंबईत होतो, सीएसटीवर होतो- खा. सुनील गायकवाड

वीर योध्दाच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन, आजवर केले २००० जणांनी रक्तदान

२६/११ ला मुंबईत होतो, सीएसटीवर होतो- खा. सुनील गायकवाड

लातूर: २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला. जवळपास २०० जणांचा बळी गेला. या दिवशी आपले खासदार सुनील गायकवाड सीएसटी स्थानकावरच होते. रात्री आठच्या सुमारास त्यांनी मुलुंडला जाणारी गाडी पकडली. घरी गेल्यावर त्यांना तासाभराने कसाबने मांडलेल्या उच्छादाचा रिपोर्ट मिळाला. मुलुंडला जाणारी गाडी त्यांना वेळेवर मिळाली अन्यथा काहीही होऊ शकले असते. वीर योद्धा या संघटनेने २६/११ च्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या रक्दान शिबिराचे उदघाटन त्यांनी केले आणि आठवणींना उजाळा दिला. श्रीकांत रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांपासून अशी शिबिरे आयोजित केली जातात. आजवर अशा शिबिरातून दोन हजार जणांनी रक्तदान केले आहे. याही शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. परवाच्या शिबिरात १६२ जणांनी रक्तदान केलं अशी माहिती श्रीकांत रांजणकर यांनी दिली.


Comments

Top