HOME   व्हिडिओ न्यूज

इद-ए-मिलादची शिरुरमध्ये मिरवणूक

शांतीचा संदेश, सर्व धर्मियांचा सहभाग, पैगंबरांना अभिवादन

इद-ए-मिलादची शिरुरमध्ये मिरवणूक

अहमदपूर (सादीक शेख): तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस मिरवणूक मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आंनद म्हणून ईद-ए-मिलादुन्नबी सण साजरा केला जातो. पैगबर हजरत मोहम्मद शेवटचे संदेशवाहक मानले जातात. त्यामुळे मुस्लिम बांधवानां त्यांच्या बद्दल नेहमी आदराची भावना असते. मुस्लीम बांधव या दिवशी रात्रभर प्रार्थना करतात, मिरवणूक काढतात कुराण व पैगंबर हजरत मोहम्मद यांचे विचार वाचतात. या रॅलीत माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणधिर पाटील, बबन बिलापट्टे, दस्तगीर किणीवाले, महेबूब सय्यद मुन्नाभाई शेख, सादिकपाशा शेख, अल्लाउद्दीन किणीवाले, ग्राहक समितीचे जमीर सौदागर, बबलू सौदागर, आदींच्या उपस्थित मिरवणूक गावातुन काढण्यात आली. दरगाहवर चादर चढवून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत शेकडो पैगंबरप्रेमी उपस्थीत होते. या वेळ ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.


Comments

Top