HOME   व्हिडिओ न्यूज

गोरोबा सोसायटीत घाणीचे साम्राज्य, रस्त्यांची दुरावस्था

गटारीचे पाणी दसरा मैदान आणि मंदिराच्या परिसरात, डेंग्यूची लागण

गोरोबा सोसायटीत घाणीचे साम्राज्य, रस्त्यांची दुरावस्था

लातूर: गोरोबा सोसायटी परिसर महापालिकेच्या कक्षात येतो की नाही असा प्रश्न पडावा अशी अवस्था आहे. या परिसरातील नाल्या बांधीव नसल्याने सगळे पाणी काही लोकांच्या घरात शिरते तर दसरा मैदानाचा बराचसापरिसर या घाणीने व्यापला आहे. येथे जवळच मुलांचे पार्क पार्क आणि मंदीर आहे. पण त्याचीही काळजी कुणी करीत नाही. याच भागात अमृतच्या पाईपलाईनसाठी मोठमोठे लांबच लांब खड्डे घेण्यात आले होते. ते अनेक दिवस न बुजवल्यानं अनेक महिला त्यात पडल्यानं त्यांचे हात मोडले होते. अनेक बालकांना इजा झाल्या आहेत. लातूर महानगरपालिका, अमृतचा गुत्तेदार याने या सर्व समस्यांचं निराकरण तातडीनं करावं अन्यथा महाराष्ट्र आर्यन सेना तीव्र आंदोलन करेल, प्रसंगी संबंधितांना ठोकून काढलं जाईल असा इशारा अध्यक्ष अविराजे निंबाळकर यांनी दिला आहे. सचिंद्र कांबळे, अनिल विरेकर, महेश हनमंते, महेश सन्मुखराव, पंकज मगर, नवीन चाळक, रवी साबळे, प्रवीण मगर, महिला आणि आर्यन सैनिक उपस्थित होते.


Comments

Top