HOME   टॉप स्टोरी

विक्रमी राष्ट्रध्वजासाठी निघाली विक्रमी रॅली

लातुरकरांनी विक्रमी संख्येनं या उपक्रमाचं साक्षीदार व्हावं

विक्रमी राष्ट्रध्वजासाठी निघाली विक्रमी रॅली

लातूर: मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचं उद्या शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या विक्रमी कार्यक्रमाची जनमाणसात माहिती पोचावी यासाठी आज नवीन रेणापूर नाक्याहून मोठी रॅली काढण्यात आली. विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. लातुरकरांसाठी भूषण ठरणार्‍या या उपक्रमाचे लातुरकरांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन अरविंद पाटील यांनी केले आहे. या रॅलीत महिला आणि विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. उद्याच्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन नगरसेविका रागिणी यादव केलं आहे.


Comments

Top