HOME   टॉप स्टोरी

गाथा लातुरच्या स्वच्छता आणि विकासाची

मागे वळून पाहताना

गाथा लातुरच्या स्वच्छता आणि विकासाची

नमस्कार,
"आज लातूर" हे वेब पोर्टल सुरु होण्यापूर्वी संपादक रवींद्र जगताप यांनी "सहारा समय" चे काम सुरु असतानाच विविध विषयांवर माहितीपटांची निर्मिती केली. त्यातले काही व्हिडिओज आपण अधूनमधून आपल्या पोर्टलवर पाहणार आहोत. त्यातलाच एक व्हिडिओ "गाथा लातुरच्या स्वच्छता, विकासाची".

गाथा स्वच्छता,काटकसर व विकासाची!

ही गाथा तयार झाली ११ मार्च २००६ मध्ये. लातूर नगर परिषदेला २००४ मध्ये विभागीय पातळीवरचा दुसरा पुरस्कार आणि  २००५ मध्ये नागरी स्वच्छता अभियानात विभागीय पातळीवरचा प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तेव्हाची ही गाथा.

लातूर मराठवाड्यातील अग्रगण्य शहर. कोणे एकेकाळी शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न राज्यात प्रसिध्द असलेले. रझाकाराचा काळ वगळता कायमच शांततेत नांदणारं लातूर. तेलबिया, गूळ, कडधान्याची व्यापारपेठ असलेले हे लातूर. नागरी स्वच्छता अभियाना अंतर्गत लातूर नगर परिषदेने शहरात ज्या विविध सोयी सुविधा केल्या त्या सोयींचे दर्शन आपल्याला या माहितीपटातून होईल. जलपुनर्भरण, सामान्य नागरिकांसाठी शौचालय सुविधा, घंटागाडीची सुविधा, झोपडपट्टी पुनर्वसन,सुसज्ज अग्निशमन दल, आरोग्य सुविधा, बीओटी तत्वावर उभारलेली शॉपिंग सेंटर्स अशा विविध गोष्टी आपण या माहिती पटातून पाहणार आहोत.


Comments

Top