logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   व्हिडिओ न्यूज

झाकीर हुसेन शाळेची बस धडकली डीपीला

बसमध्ये सात ते आठ विद्यार्थिनी, दोघी जखमी

लातूर: आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन मुलींच्या शाळेच्या बसने कव्हा मार्गावरील चन्नबसवेश्वर महाविद्यालयाजवळ वीज पुरवठा करणार्‍या डीपीला धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. समरीन शेख पटेलनगर, सुमय्या सय्यद खुब्बानगर अशी या दोघींची नावे आहेत. घटना घडली त्यावेळी बसमध्ये सात ते आठ विद्यार्थिनी होत्या असे सांगितले जाते. या धडकेत डीपीचे मोठे नुकसान झाले. पण ते भरुन देण्याची तयारी शाळेनं दाखवल्याने ती सोडून देण्यात आली. बसचे स्टेअरींग जाम झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. लातुरात शाळांच्या बसेस अतिशय वेगाने चालवल्या जातात त्या किमान वेगाने आणि सुरक्षितरित्या चालवाव्यात अशी विनंती प्रत्यक्षदर्शीं प्रशांत जोजारे यांनी केली आहे.


Comments

Top