HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर वृक्षकडून डिव्हायडरची सफाई

मनपाचे फारसे सहकार्य नाही, झाडेही लावली, संगोपनही करतात


लातूर: लातूर शहरात लातूर वृक्ष या संस्थेने वृक्षारोपणात उत्तम काम केले आहे, करीतही आहेत. शहरातील डिव्हायडर्सची सफाई करुन त्यात वृक्षही लावले जात आहेत. या वृक्षांच्या संगोपनावरही त्यांचं लक्ष असतं. भल्या सकाळी त्यांची मोहीम सुरु होते. त्याला नागरिकांचाही हळूहळू प्रतिसाद मिळत आहे असं या मोहिमेचे प्रमुख सुपर्ण जगताप सांगतात. या मोहिमेत सुनंदा जगताप, मिनाक्षी कोंडगे, डॉ. बीआर पाटील, डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, नामदेव सुपलवाड, तुकाराम गुणवंते, डॉ. भास्कर बोरगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी असतात.


Comments

Top