HOME   व्हिडिओ न्यूज

१७ सार्वजनिक शौचालयांचे लोकार्पण

फेरीवाल्यांचा प्रश्न १० दिवसात निकाली काढा- पालकमंत्री निलंगेकर


लातूर: सार्वजनिक शौचालये उभी करण्यासाठी ४० वर्षे का लागली असा प्रश्न पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला. शहरात एक मिशन म्हणून उभारण्यात आलेल्या १७ सार्वजनिक शौचालयांचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.
स्वच्छ सर्वेक्षण होऊन गेले, त्याचा दुसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गंजगोलाईला १०० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लोकांची बैठक व्यवस्था, शौचालये आणि सजावट केली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे अशी माहिती आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. शादीखाना आणि नाट्यगृहासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगून संपूर्ण लातूर शहर वीज वाचवणार्‍या दिव्यांनी उजळून निघेल अशीही माहिती त्यांनी दिली. लातूरात सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी एवढा काळ का लागावा याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत फेरीवाल्यांचा प्रश्न दहा दिवसात निकाली काढा असे सूचित केले.
पीव्हीआर चौक ते नांदेड नाका या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत याबद्दल त्या काळच्या महापौरांना सूचना दिल्या होत्या पण काहीच झाले नाही, आता मनपात भाजपाची सत्ता आहे. १७ शौचालये उभी राहिली ही ऐतिहासिक बाब आहे असे खा. सुनील गायकवाड म्हणाले. यावेळी मनपाचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.


Comments

Top