• 20 of March 2018, at 7.36 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

पंचनामा: लग्नाचा दिवस, अधिकारी गायब!

कृषी अधीक्षक कार्यालयात कोण कुठे गेले कुणालाच माहित नाही!

लातूर: कार्यालयीन वेळेत एखादा कर्मचारी-अधिकारी गायब असणं समजू शकतं पण सगळ्याच विभागाचे प्रमुख गायब होतात आणि कुणालाच माहित नसतं असा अजब प्रकार आज कृषी अधीक्षक कार्यालयात पहायला मिळाला. शिवाजी चौकातील प्रशासकीय इमारतीत कृषी अधिक्षकांचे कार्यालय आहे. या विभागात वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागाला एक प्रमुख आहे. आज दुपारी साडेबारा ते दीड या दरम्यान या सर्वांच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. फक्त चार पाच कारकून कागदांशी झटापट करताना दिसत होते. येणार्‍या जाणार्‍याला साहेब नाहीत उद्या या अशी उत्तरं मिळत होती. आम्हीही चौकशी केली पण या कार्यालयातला कुणीही कर्मचारी कोण कुठे आहे हे सांगायला तयार नव्हते. कळालेल्या माहितीनुसार ही सगळी मंडळी एका लग्नासाठी गायब झाली होती. पण त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सगळीच सरकारी कार्यालये भरुन जातात. किमान आजच्या दिवशी तरी अधिकार्‍यांनी खुर्च्या सांभाळाव्यात अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. त्यातच शेतकर्‍यांचे प्रश्न उत्तरोत्तर बिकट होत असल्याने किमान कृषी कार्यालयात तरी ‘साहेब’ भेटायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments

Top