HOME   व्हिडिओ न्यूज

पाण्यासाठी संघर्ष, काही घरांना मिळतं काहींना नाही!

एकाच लाईनवरचा प्रॉब्लेम, पाणी वितरणाचा उत्तम नमुना


लातूर: शहरातील सावेवाडी भागातील जलवितरणाचा अजब प्रकार आज येथे दाखवत आहोत. वडारवाड्याच्या पुढच्या भागातील वस्तीतील नागरिक जाम वैतागले आहेत. एकाच लाईनवर अवलंबून असलेल्या या भागातील केशवराज अपार्टमेंट आणि त्याच्या बाजुचे कुलकर्णी यांना बिलकुल पाणी येत नाही पण पुढच्या आणि मागच्या घरांना उत्तम पाणी येतं आज पाणी आलं होतं. पहाटे पाचपासून लोक जागे होते. पण व्हायचं तेच झालं. सगळ्यांना पाणी उत्तम मिळालं पण केशवराज अपार्टमेंट आणि कुलकर्णींना थेंबही मिळाला नाही. अखेर ज्यांच्याकडं उत्तम पाणी चालू आहे असे याच भागातील रहिवासी स्वामी यांच्या घरात मोटार लाईन, पाईपलाईन जोडून केशवराज अपार्टमेंटमध्ये पाणी आणलं गेलं. सगळ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे हे अपार्टमेंट माजी स्थायी समिती सभापती, कॉंग्रेसचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी डेव्हलप केलेले आहे. याभागाचे नगरसेवक, अशोक गोविंदपूरकर, राजा मनियार, सपना किसवे आणि रेहाना बासले हे आहेत! टंचाई काळात हे कुणीही या भागात फिरकले नाहीत.


Comments

Top