HOME   व्हिडिओ न्यूज

रहदारी नियंत्रणाचा दावा काय अन वास्तव काय?

बघा लाईव्ह, बॅरीकेट्स फोटोपुरते आले अन गेले, शिवाजी चौक जैसे थे


रहदारी नियंत्रणाचा दावा काय अन वास्तव काय?
बघा लाईव्ह, बॅरीकेट्स फोटोपुरते आले अन गेले, शिवाजी चौक जैसे थे
मनपाच्या बातमीत सांगितलेले उपाय आणि ठिकाणांची करा पाहणी
मनपाने पाठवलेली बातमी...
वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी याकरिता शहरातील मुख्य चौकात बॅरिगेटिंगची सोय
लातूर शहर महानगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने आयुक्त एमडी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, शहरातील मुख्य चौक मोकळे व्हावे याकरिता शहरातील मुख्य चौकांची पाहणी करण्यात आली होती, त्या नुसार शहरातील मुख्य चौकामध्ये बॅरिगेटिंग बसविण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे.
लातूर शहरातल्या सर्व मुख्य चौकांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी याकरिता बॅरिगेटिंग बसविणे हे अत्यंत आवश्यक असल्या कारणास्तव लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने बॅरिगेटिंग बसण्याची व्यवस्था करण्यात आली, शहरातल्या शिवाजी चौकातील वाहतूक ही मुख्यता सुरळीत व्हावी याकरिता औसा रोड एसटी डेपो समोरून येणारी व औसा रोड कडे जाणारी वाहने यामुळे तसेच एसटी बस डेपो मध्ये जाण्याकरिता व्यवस्थित व्यवस्था व्हावी व वाहतुकीस कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याकरिता शिवाजी चौकामध्ये बॅरिगेटिंग बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच गंजगोलाईकडील हनुमान चौक ते गोलाई मुख्य रस्ता येथील चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था ही साळे गल्ली ते महावितरण कार्यालयाशेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली आहे, हनुमान चौक ते गोलाई या ठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार रहदारीस अडथळा निर्माण होत होता, त्या कारणास्तव सदरील ठिकाणी लावण्यात येणारे चारचाकी वाहनांची व्यवस्था ही महावितरण कार्यालयाच्या बाजूस करण्याची व्यवस्था लातूर मनपाच्या वतीने करण्यात येत आहे, शहरातल्या मुख्य चौकांमध्ये बॅरिगेटिंग बसविणे वाहतुकीस अडथळा होऊ नये याकरिता नियोजन करण्यात येत आहे. जुना रेणापूर नाका येथील वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता आयुक्त यांनी सूचना केल्यानुसार तत्काळ त्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच हरंगुळ पानंद रोडचे कार्य ही पुढील काळात हाती घेऊन कार्य सुरू करण्यात येणार आहे. लातूर शहर महानगरपालिका माननीय आयुक्त यांच्या पुढाकाराने व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावे याकरिता शहराची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार माननीय आयुक्त यांच्या आदेशाने सदर काम तात्काळ सुरू करण्यात आलेले आहे पुढील काळात शहर वाहतुकीला शिस्त लावण्यात यावी याकरिता अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत, काही काळातच शहर वाहतूक व्यवस्था व्यवस्थित व सुरळीत होईल याकरिता लातूर मनपाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, शहरातल्या इतर ठिकाणी छोटे मोठे रस्ते आहेत त्याठिकाणी अतिक्रमण करण्यात येत आहे. या ठिकाणाचे अतिक्रमण ही काढण्याचे नियोजन व रस्ता रुंद करण्याकरिता लागणारे नियोजन मनपा वतीने करण्यात येत आहे, नागरिकांनी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्कं करून वाहतुकीस अडथळा होउ नये याकरिता सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


Comments

Top