HOME   व्हिडिओ न्यूज

गौतम बुद्धांचं नाव पुन्हा उदयाला येईल!

रुई रामेश्वरमध्ये बुधाजीराव मुळीक आणि मिलिंद कांबळेंना बुद्ध विश्वशांती पुरस्कार


लातूर: आज बुद्ध जयंती. समस्त मानव जातीला शांततेचा संदेश देणार्‍या गौतम बुद्धांना आज जगभर मानवंदना दिली जात आहे. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे यांच्या वतीने उई रामेश्वर येथे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभात बौद्ध बांधवांसह, आंबेडकर अनुयायी आणि विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते. या कर्यक्रमात कृषीरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक आणि पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना तथागत गौतम बुद्ध पंचशील विश्वशांती उरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गौतम बुद्धांचे नाव पुन्हा उदयाला येईल असे प्रा. डॉ. वि. दा. कराड यावेळी म्हणाले. यावेळी डॉ. गोपाळराव पाटील
सुधाकर शृंगारे, प्रा. रतनलाल सोनग्रा, मोहन माने, सुनील देशपांडे, एसएन पठाण, मंगेश कराड, रमेश कराड, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Comments

Top