HOME   व्हिडिओ न्यूज

मतमोजणी बरीच बाकी, दोन अडीच वाजतील

भाजप कार्यकर्त्यांनी भर उन्हात सुरु केला जल्लोष


लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे बाजी मारतील असे चित्र स्पष्ट होऊ लागलेय. प्राप्त माहितीनुसार शृंगारे यांना ३९९३४७ तर कॉंग्रेसच्या मच्छींद्र कामत यांना २२२१७२ मते मिळाल्याचे समजते. अजून साडेचार लाख मते मोजायची बाकी आहेत. त्याला रात्री अडीच तीन वाजतील असंही सांगण्यात येतंय. सुरुवातीला फेर्‍यानुसार मतदान सांगण्यात आले. नंतर टेबलनिहाय सांगण्यात आले. पुन्हा दोन्ही बंद करुन कुणाला किती अन कुणाला किती मते मिळाली हे सांगण्यात येऊ लागल्याने संभ्रम निर्माण झाला. दरम्यान भाजप उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाल्याने कार्यकर्त्यांनी उन्हातच जल्लोष सुरु केला. अजून घोडामैदान बरंच बाकी आहे.


Comments

Top