HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरला अद्ययावत दृष्टी!

नेत्ररुग्णांच्या संख्येत वाढ, जागृतीही वाढली, काळजी घ्या- डॉ. प्र. के. शहा


लातूर: भारतात नेत्ररुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तशीच डोळ्यांबद्दल जागृतीही वाढली आहे. नेत्रदोष दोष जवळचा असो की दूरचा संख्या वाढतेच आहे. याचं कारण मुळात आहारात आहे. आहारात हिरवं असावं, गाजराचा वापर असावा. चौकस आहारच नेत्रदोषाला लांबवू शकतो, दूर ठेऊ शकतो असे प्रतिपादन प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. प्र. के. शहा यांनी केलं. शाहू महाविद्यालयासमोरील दृष्टी ऑप्टीकल्स या अद्ययावत दालनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या अद्ययावत दालनात सर्व आघाडीच्या कंपन्यांचे गॉगल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. तरुण, तरुणी मुले, मध्यमवयीन वयोवृद्धांना लागणारे चष्मे, गॉगल्स या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. सेंटर एसीची सुविधा या ठिकाणी असून संगणकाद्वारे अचूक नंबर सांगण्याचीही सोय करण्यात आली आहे अशी माहिती या दालनाचे मालक, संचालक कैलास बिडवई यांनी दिली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. अतिशय कमी जागेत निलेश राणे यांनी उत्तम इंटेरियर डेकोरेटींग केले आहे. मोठ्या जागेत असं काम करणं सोपं असतं. पण कमी जागेत एवढ्या सगळ्या गोष्टी उभारणं आव्हानच होतं असं ते म्हणाले.
(कैलास बिडवई 9422072658)


Comments

Top