HOME   व्हिडिओ न्यूज

आ. विनायकराव पाटील यांनी घडवला सामुदायिक विवाह

आठ जोडप्यांचे विवाह, संसारोपयोगी साहित्यही दिले, खासदारही उपस्थित


अहमदपूर: दुष्काळामुळे शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा स्थितीत त्यांना मुला-मुलींचे विवाह करणे कठीण होऊन बसले आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा त्यांना मदत करणे आवश्यक आहे. याचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहन आ. विनायकराव पाटील यांनी केले. अहमदपूर तालुक्यातील शिरुर येथे महेश विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी खा. सुधाकर शृंगारेही उपस्थित होते. यावेळी आठ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले.
यावेळी माजी आमदार बब्रूवान खंदाडे, हरिभाऊ येरमे, चंद्रशेखर पाटील, महेश बिलापट्टे, नागनाथ बिराजदार, शिवानंद भोसले, अल्लाउद्दीन किनीवाले यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, नवदांपत्याचे निकटवर्तीय उपस्थ्त होते.


Comments

Top