HOME   व्हिडिओ न्यूज

शिरुरची स्वामी विवेकानंद शाळा आता नूतन इमारतीत

मराठी शाळेत शिकूनही इंग्रजी शिकता येतं, करियर करता येतं- आ. विक्रम काळे


शिरुर ताजबंद: अलिकडे इंग्रजी शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढला आहे. बर्‍याचदा आठवीपर्यंत इंग्रजीत शिकून विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांकडे परततात. इंग्रजी ही जगाची भाषा आहे. पण मराठी मातृभाषा आहे. मराठी शाळेत शिकूनही इंग्रजी शिकता येतं, करियर करता येतं, शिरुरच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेनं आता सेमी इग्रजीही सुरु केले आहे ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. आ. काळे, आ. सतीश चव्हाण, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत या शाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले. या निमित्ताने पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ही शाळा अत्याधुनिक करण्यात आली आहे. डिजिटल व्यवस्था, सेमी इंग्लीश, संगणक प्रयोगशाळा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण मिळावे यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानोबा डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य मंचकराव पाटील, सरपंच सावित्रीबाई पडोळे, पंचायत समिती सदस्य सुशिलाताई भातिकरे, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Top