HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरात अर्धा तास चांगला पाऊस

वातावरण बदलून गेला, या हंगामातला पहिला मोठा पाऊस


लातूर: आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास लातुरात पावसाला सुरुवात झाली. आधी संततधार आणि कमी वेगानं बरसणार्‍या या पावसानं पुढे चांगला जोर धरला. अडीच वाजेपर्यंत चांगला जोर होता. नंतर त्याची तीव्रता कमी झाली. पुढे पंधरा वीस मिनिटे रिमझिम सुरु होती. उदगीर, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, औसा आदी भागातही चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे.


Comments

Top