HOME   व्हिडिओ न्यूज

बौध्द विहारासाठी उपोषणकर्त्यांनी केले मुंडन

बौद्ध विहाराचे संरक्षण करा, अनधिकृत बांधकाम थांबवा, आंदोलकांची मागणी


लातूर: लातूर शहरातील जुन्या ग्रेन मार्केट परिसरातील बुद्धगया बौद्धविहार अनेक वर्षांपासून आस्तित्वात असून त्या ठिकाणी सर्व प्रकारचे धार्मिक विधी वेळोवेळी होत असतात. २००४ साली बुद्धगया बहुद्देशीय मंडळही स्थापन करण्यात आले. बलदवा अ‍ॅंड कंपनीच्या खाजगी जागेत हे विहार बांधले, या ठिकाणी झाडेही जोपसण्यात आली पण मनपाने ही जागा आपली असल्याचे सांगत येथील विहार हटवले. या ठिकाणी आता शादीखाना बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कसलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. शादीखान्याची जागा लाल गोदाम येथे निश्चित करण्यात आलेली असताना बौद्ध विहारावर घाला घालण्यात आला. याच्या निषेधार्थ मनपासमोर बौद्ध बांधवांनी उपोषण सुरु केले आहे. मनपाने ही कारवाई थांबवावी अन्यथा उपोषण असेच चालू राहील असा इशारा या बांधवांनी दिला आहे. आज राजेंद्र पवार, सलीम शेख, अविनाश सरकाळे, देवीदास सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी मुंडनही करुन घेतले. या आंदोलनात गोरख बिड्डे, प्रकाश कांबळे, वैजनाथ चक्रे, शेख खलील, सुरेखा बिरादार, लक्ष्मण भोसले, अविनाश सरकाळे, बंटी साबळे, मिना कांबळे सहभागी झाले आहेत.


Comments

Top