HOME   व्हिडिओ न्यूज

३१ दिवस, चार पाऊस.....आजचा बरा होता

अर्धा महाराष्ट्र आवर्षणात, यंदांचे हंगामही धुसर


लातूर: जून महिन्याच्या सात तारखेला मृग निघतो आणि पावसाला सुरुवात होते. हे पुस्तकात वाचायला मिळते. हा अनुभव आजकाल येत नाही. सात जून नंतर लातूर भागात तीन पाऊस झाले. त्यातला शेवटचा बरा होता. मृगाला एक महिना एक दिवस झाल्यानंतर आज ३१ दिवसांनी दुपारी बरा पाऊस झाला. बराच काळही होता. नाही तर दररोज दुपारी चांगले आभाळ येते, ढग वाकुल्या दाखवतात. बरसायचं कर्तव्य विसरुन जातात. माणसांनीच कर्तव्याकडे पाठ फिरवली असेल तर मग ढगांनी तरी काय घोडं मारलंय? २०१६ च्या भीषण दुष्काळानंतर १,१११ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला. ८०२ मिलीमीटर सरासरी असलेल्या लातूर जिल्ह्याला ही लॉटरीच होती. पण लॉटरी नेहमी लागत नसते हे पावसाने दाखवून दिले. नंतर तो कमी होत गेला. यंदा काय होते? हा खरा प्रश्न आहे.


Comments

Top