HOME   व्हिडिओ न्यूज

आ. विनायकराव पाटलांचा वाढदिवस साधेपणाने

कार्यकर्त्यांना आवाहन, गरिबांना मदत करा, शैक्षणिक साहित्य द्या, हार तुरे नको


अहमदपूर: आ. विनायकराव पाटील यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. या निमित्ताने त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. अहमदपूर, चाकूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमदारांनी आवाहन केले. शिरुर ताजबंद येथील भाजप कार्यकर्त्यांनी मौजे धाकटेवाडी, थोरलेवाडी, महादेववाडी, शिरुर ताजबंद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्या आणि र्झाडे देऊन आ. विनायकराव पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. यासाठी बालाजीदादा सारोळे, महेश बिलापट्टे, रणधीर पाटील, गजेंद्र वलसे, एन. टी. बिराजदार, मुन्ना शेख, अल्लाऊद्दीन किनिवाले, शिवानंद भोसले, हनुमंत बडगिरे, मच्छींद्र कांडनगिरे, शिवचंद्र मलफेद्रेवार, मारुती मोरे यांनी परिश्रम घेतले.


Comments

Top