HOME   व्हिडिओ न्यूज

विलासरावांना श्रद्धांजली, २०० आरोग्य शिबिरे, पूरग्रस्तांना नानाची घरं, कॉंग्रेस पुन्हा वंचितकडे, दर्शनासाठी आधार कार्ड.....१४ ऑगस्ट २०१९


* बाभळगावच्या प्रार्थना सभेत लोकनेते विलासराव देशमुख यांना हजारोंनी वाहिली आदरांजली
* विलासरावांच्या स्मृतीदिनानिमित्त आज २०० ठिकाणी आरोग्य शिबीरांचं आयोजन
* लातुरचे संजय बनसोडे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक, सोने आणि रोकडही जप्त
* वंचित आघाडीला कॉंग्रेस आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु, वंचित लढणार गॅस सिलिंडर चिन्हावर
* महाराष्ट्राने केली पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे सहा हजार कोटी रुपयांची मागणी, पुरामुळे सांगलीत १४४८ तर कोल्हापुरात साडे आठ हजार घरांचे नुकसान
* येत्या दोन दिवसात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता
* पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन यांनी घेतला पुढाकार
* शिर्डीचे साई संस्थान पूरग्रस्तांसाठी देणार १२ कोटी
* कोल्हापुरच्या शिरोळ आणि सांगलीत नाना पाटेकरची संस्था पुरग्रस्तांना बांधून देणार घरे
* पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांचे स्नेहभोजन रद्द
* लेखक, कवीवर्य रामदास फुटाणे यांना आचार्य अत्रे सन्मान
* शशी थरुर यांना अटक वॉरंट जारी, पाकिस्तान प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा परिणाम
* सोन्याच्या भावात कमालीची वाढ, पोचले ३७ हजार ८०० रुपयांवर
* काश्मीर प्रश्नी हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार
* पॉप सिंगर मिकासिंगने केलं पाकिस्तानात एका लग्नात नाचगाणं
* भारताचे चांद्रयान आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
* सुषमा स्वराज यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो, पंतप्रधानांकडून आदरांजली
* भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठीत पुरस्कारांची आज घोषणा
* शरद पवार करणार पूरग्रस्त कोल्हापुरचा दोन दिवसांचा दौरा
* आता तुळजाभवानी मंदिरात आधार कार्डाशिवाय प्रवेश मिळणार नाही
* नागपुरात चुकीच्या पद्धतीने वेगानं वाहन चालवणार्‍या तरुणाची जमावाकडून हत्या
* राज्यातील महापौर आणि उप महापौरांच्या निवडी विधानसभा निवडणुकीनंतर
* मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पुढचा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरु होणार
* डीएसकेंचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावर अटक
* डिसेंबर महिन्यात भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांची निवड
* ३७० कलम रद्द झाल्यानं पाकिस्तान पाळणार १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस
* राज्यसभेसाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग दाखल करणार उमेदवारी अर्ज
* स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती करणार देशाला संबोधन
* पाकव्याप्त काश्मीरबाबत भारत सरकार उचलणार मोठं पाऊल
* पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान करणार आज पाकव्याप्त काश्मीरचा दौरा
* भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये तिसरा वन डे सामना होणार त्रिनिनादमध्ये


Comments

Top