HOME   व्हिडिओ न्यूज

नगरसेवक गवळींचे निधन, भिकारी इम्रान खान, जेटलींची प्रकृती नाजूक, कर्नाटक मंत्रीमंडळाचा विस्तार, कॉंग्रेसची जेलगाडी.....१९ ऑगस्ट २०१९


* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३७४१, तूर ६०२१ तर हरभरा पोचला ४५७० रुपयांवर
* महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना रिलायन्सने दिले पाच कोटी
* बीब बी अमिताभ बच्चन यांच्याकडून पूरग्रस्तांना ५१ लाख रुपये
* पूरग्रस्तांना मदत करण्यात अडचणी येत असतील तर सरकारने निवडणुका पुढे ढकलाव्यात, कवीवर्य ना. धों. महानोर यांची सूचना
* लातुरचे नगरसेवक शिवकुमार गवळी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
* सांगली जिल्ह्यातील अनेक गावे मदतीपासून दूर, लातुरच्या पथकाने कृष्णेकाठच्या डिग्रस गावाला केली मदत
* कोल्हापूर आणि सांगलीतील पुरात बळी गेलेल्यांची संख्या पोचली ५८ वर, सांगलीतील पूर ओसरल्यानंतर सापडले २२३ साप
* २० ते २७ ऑगस्ट आ. अमित देशमुख लातुरात, गाठीभेटी आणि प्रश्नांची सोडवणूक करणार
* गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवणार, अभिमन्यू पवार यांची औसा येथे ग्वाही
* कावळ्यांची नाही तर मावळ्यांची चिंता करा, राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात शरद पवार यांचा सल्ला
* महायुतीने रिपब्लिकन पक्षासाठी १० जागा सोडाव्यात, आणखी एका महमंडळाचे अध्यक्षपद द्यावे, रामदास आठवले यांची मागणी
* मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या बहुतांश रेल्वेगाड्या आजपासून नियमितपणे सुरु होणार
* कलबुर्गी हत्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध आरोपपत्र, तिघे कर्नाटकचे, तिघे महाराष्ट्राचे
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सदिच्छा भेट
* माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती नाजूक, दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील सुरक्षा वाढवली
* अरुण जेटलींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशावर आर्थिक मंदीचे संकट आले, सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप
* मोहन भागवत, अरविंद केजरीवाल यांनी घेतली जेटली यांची भेट
* पुणे जिल्ह्यातील २३ धरणांपैकी २१ धरणे शंभर टक्के भरली, मराठवाडा अजून निराशच
* उद्या २० तारखेला कर्नाटक मंत्रीमंडळाचा विस्तार
* कोहिनूर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, २२ ऑगस्ट रोजी होणार चौकशी, मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची आज चौकशी
* काँग्रेसची सध्या 'बैलगाडी' झाली असून, लवकरच 'जेलगाडी' होणार, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे भाकित
* पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार ८२२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
* पूरग्रस्त जनावरांवर उपचार करण्यासाठी लातुरहून आलेल्या पशुधन पर्यवेक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
* गुगलवर भिकारी शब्द टाकताच येतो कटोरा हातात घेतलेला इम्रान खानचा फोटो


Comments

Top