HOME   व्हिडिओ न्यूज

पाऊस रागावला, धो धो बरसला!

पावसाला असाच राग रोज येत रहावा....


लातूर: आज दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा समाचार घेणारी बातमी केली. पाऊस कसा मंत्र्यासारखा वागतो, धावता दौरा करतो, मंत्र्यांसारखा वागतो, पश्चिम महाराष्ट्रावरच प्रेम करतो असं बरंच काही या बातमीत म्हटलं होतं. बहुधा ही बातमी पावसापर्यंत पोचली असावी. त्यानं दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास लातुरवर हल्ला चढवला. सुमारे तासभर उत्तम बरसला. पावसाला असाच राग नेहमी येत राहो ही सदिच्छा....


Comments

Top