HOME   व्हिडिओ न्यूज

अरुण जेटली यांचे निधन, घाडगे रुग्णालयात, लोणीकर लातुरात, देश हिंदूंचा! कृत्रिम पाऊस यशस्वी, विमानांचा इंधन पुरवठा बंद.....२४ ऑगस्ट २०१९


* माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या ६६ व्या वर्षी निधन
* आज लातुरच्या बाजारात; सोयाबीन ३७२१, तूर ५८४२ तर हरभरा पोचला ४४९९ रुपयांवर
* शेतकर्‍यांच्या प्रश्नावर औशात छावा संघटनेचे बेमुदत उपोषण सुरुच, प्रकृती खालावल्याने विजयकुमार घाडगे लातुरच्या सरकारी दवाखान्यात दाखल
* दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नांचा निकाल लागल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, छावा संघटनेचा निर्धार
* छावा संघटनेने पुकारलेल्या लातूर बंदला संमिश्र प्रतिसाद, पोलिसांनी घेतले आठ कार्यकर्त्यांना ताब्यात
* पालकमंत्री संभाजी पाटील यांनी औसा येथे घेतली छावाच्या उपोषणकर्त्यांची भेट, मागण्या मान्य करण्याचे आश्वासन
* आ. अमित देशमुख यांचे संपर्क अभियान, कामदार मार्गावरील कपड्यांच्या दुकानास भेट, व्यापार्‍यांशी विचार विनिमय
* भातखेडा, भातांगळी, बामणी, चिखलठाणा गावातील ग्रामस्थांशी युवा नेते धीरज देशमुख यांनी साधला संवाद
* रमेश कराड यांचा जोरदार ग्रामीण दौरा, संवाद साधत केले विकासकामांचे भूमीपूजन
* पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर रविवारी २५ तारखेला लातूर दौर्‍यावर, पाणी पुरवठ्याचा घेणार आढावा
* भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, चौघांना काढले ढिगार्‍यातून बाहेर
* ३७० कलमच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी आज काश्मीरला जाण्याची शक्यता
* आज गोकुळाष्टमी, अनेक ठिकाणी दही हंडीचे आयोजन, अनेक मंडळांनी केली पूरग्रस्तांना मदत
* देशात हिंदुंचे प्राबल्य, त्यांच्या मनावरच देश चालेल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात विधान, भाजपमध्ये आलेल्यांचीही इडीकडून चौकशी होऊ शकते, पाटील यांचा इशारा
* मागच्या वर्षभरात देशभरात साडेपाच हजार एटीम पडले बंद
* अहमदनगर जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी, प्रयोगानंतर मुसळधार पाऊस
* श्रीलंकेमार्गे सहा अतिरेकी भारतात घुसल्याची माहिती, अतिरेकी कोईमतूरमध्ये असल्याचा संशय, अलर्ट जारी
* माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ
* आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारची अनेक पावलं, जीएसटी करात बदल करणार
* पक्ष सोडून जाणार्‍या नेत्यांच्या जागांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नवीन उमेदवारांचा शोध जारी
* सक्त वसुली संचालनालय अर्थात इडीच्या कार्यालयाची पाटी मराठीत लिहा, मनसेची मागणी
* लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालयाचा दर्जा रद्द होऊ देणार नाही, रामदास आठवले यांचा निर्धार
* महाराष्ट्र शिखर बॅंकेतील घोटाळा प्रकरणी कारवाई करणारच, मुख्यमंत्री आक्रमक
* विमा कंपन्यांच्या चुकांमुळे ९० लाख शेतकरी अपात्र, सरसकट विमा द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी
* दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानवर दिवाळखोरीची वेळ, अर्थसहाय्य करण्यास जागतिक संस्था नाखूष
* दिल्ली विद्यापिठात सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना, एनएसयूआयवर संशय
* स्वातंत्र्यवीर सावरकर यांना न मानणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पवित्रा
* थकित रकमेमुळे अनेक तेल कंपन्यांनी एअर इंडीयाच्या विमानांचा इंधन पुरवठा थांबवला
* मारुती सुझुकीने सुरक्षा तपासणीसाठी ४० हजार वॅगन आर कार मागवल्या परत
* विधानसभेची निवडणूक १५ किंवा १६ ऑक्टोबरला होण्याची शक्यता
* सोनं पोचलं ३८ हजार ८६५ रुपयांवर
* सर्वाधिक कमाई करणार्‍या जगातील १० अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार आघाडीवर
* महेंद्रसिंग धोनी राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा


Comments

Top