HOME   व्हिडिओ न्यूज

एक हजार गुरुजणांचा गौरव, जीवन गौरव पुरस्कार

द्वारकादास शामकुमार ग्रुपकडून आयोजन, प्रा. यजुवेंद्र महाजन यांचं व्याख्यान


लातूर: द्वारकादास शामकुमार या सुप्रसिद्ध वस्त्रदालनाच्या वतीनं उद्या रविवारी जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांचा गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दयानंद सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध शिक्षण तज्ञ प्रा. यजुवेंद्र महाजन यांचे बदलत्या काळानुसार सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर आधारीत संस्कार, संस्कृती, ध्येयप्राती नातेसंबंधाने प्रेरणादायी व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. समाजाच्या जडणघडणीत योगदान देणार्‍या या शिक्षकांचे औक्षण करुन, मायेची शाल पांघरुन, गौरवपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. तर संगीततज्ञ डॉ. राम बोरगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे अशी माहिती प्रसिद्ध उद्योजक तुकाराम पाटील यांनी दिली.
(तुकाराम पाटील 9730199991)


Comments

Top