HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर जिल्ह्यातील हजारावर गुरुजनांचा गौरव

डॉ. राम बोरगावकरांना जीवन गौरव, द्वारकादास शामकुमारने केले आयोजन


लातूर: गुरुजनांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी लातुरच्या प्रसिद्ध द्वारकादास शामकुमार या वस्त्रदालनाच्या वतीने जिल्ह्यातील हजारांवर शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त दयानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील योगदानबद्दल डॉ. राम बोरगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. द्वारकादास शामकुमार वस्त्रदालनाचे संचालक तुकाराम पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी अशा कार्यक्रमाचं तालुकानिहाय आयोजन केलं जातं. यंदा जिल्हा पातळीवर या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला येणार्‍या शिक्षक-शिक्षकांचं औक्षण करुन त्यांना सन्मानचिन्ह आणि शाल प्रदान करण्यात आली. प्राचार्य अनिरुद्ध जाधव, प्रा. शिवराज मोटेगावकर, निवासी उप जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होती.
आपली मुलं आपलं ऐकतात का?
या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षण तज्ञ प्रा. यजुवेंद्र महाजन यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज शिक्षक हा समाजातला सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याच्या जीवनात परिवर्तन झाल्यास पुढची पिढी निश्चितच चांगली घडू शकते. आपली मुलं आपलं ऐकतात का? त्यांच्या प्रश्नांचं समाधान आपण करु शकतो का? कॉलेजातल्या मुलांना शिकवणं सोपं आहे. पण लहान मुलांना घडवणं कठीण असतं. समाज आपल्याबद्दल काय विचार करतोय याचा कधी विचार केला आहे का? शिक्षकाच्या प्रतिमेबद्दल समाजात थोडी गडबड निर्माण झाली आहे. शिक्षकी पेशा सर्वांना उत्तम वाटतो. अशा अनेक अंतर्मुख करणार्‍या बाबी महाजन यांनी मांडल्या.


Comments

Top