HOME   व्हिडिओ न्यूज

तिसरी बौद्ध धम्म परिषद नोव्हेंबरमध्ये लातुरात

देशभरातील बौद्ध अभ्यासक, तत्वज्ञ, भाष्यकार, भिक्खू संघाची उपस्थिती


लातूर: बौद्ध धम्म संस्कार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तिसर्‍या अखिल भारतीय बौद्ध परिषदेचे आयोजन तीन नोव्हेंबरला लातूर येथे करण्यात आले आहे. या परिषदेस देशभरातील बौद्ध अभ्यासक, तत्वज्ञ, भाष्यकार, भिक्खू संघाची उपस्थिती राहणार आहे. ही माहिती बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव भिक्खू पय्यानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.धम्मचक्र गतीमान करण्याच्या प्रक्रियेतून धम्म प्रचार, प्रसाराचे कार्य लातुरमध्ये ६० वर्षांपासून सुरु आहे.धम्म प्रचारातून माणसला नितीमान, अदाचारी बनविण्याचा विचार सातत्याने वेगवेगळ्या बुद्ध विहारातून दिला जातो. म्हणूनच देश विदेशातेल ज्ञानी भ्ह्क्खू निमंत्रित करुन जनसमुहाला सदाचाराची शिकवण देऊन संस्कारीत करण्याचे कार्य धम्म परिषदातून होत असते असेही पय्यानंद म्हणाले. यावेळी मोहन माने, लक्ष्मण कांबळे, अनंत लांडगे, केशव कांबळे, दुष्यंत कटारे उपस्थित होते.


Comments

Top