HOME   व्हिडिओ न्यूज

पंतप्रधानांचा वाढदिवस महिलांनी केला साजरा

फळं, साड्या, औषधांचं वाटप; मोदींच्या निर्णयांचं कौतुक


लातूर: लातूर शहरातील काही महिलांनी एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला. कुठल्याही पक्ष-संघटनेची मदत न घेता स्वयंस्फूर्तपणे या महिलांनी गंजगोलाईत फळे, साड्या आणि सामान्य औषधांचं वाटप केलं. यामुळे अनेक गरजूंना लाभ झाला. मोदीजींनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयांबद्दल या महिलांनी समाधान व्यक्त केलं. वितरणाआधी या महिलांनी जगदंबेची आरतीही केली. या उपक्रमात ज्योती मारकडे, अनुराधा जाधव, पूजा शेळके, प्रगती डोळसे, ज्योती रसाळ, पुष्पा भडीकर, लता घायाळ या भगिनी सहभागी झाल्या होत्या.


Comments

Top