HOME   व्हिडिओ न्यूज

वाढीव वीज बिलांविरोधात न्यायालयात जाणार

लातूर नागरिक हक्क समितीचा निर्णय, अवाजवी बिले स्विकारणार नाही!


लातूर: महावितरणकडून दिल्या जाणार्‍या अवाजवी आणि वाढीव बिलांच्या विरोधात नागरिक हक्क समितीने आपला लढा कायम ठेवला असून लातूर बंदनंतर आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. तत्पूर्वी नागरिकांच्या तक्रारी ग्राहक पंचायतीतही नेण्याचे ठरले असल्याचे या आंदोलनाचे समन्वय्क उदय गवारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या परिषदेला कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, व्यापारी महासंघाचे दिनेश गिल्डा, प्रदीप गंगणे, रणधीर सुरवसे, पंडीत कावळे, दत्ता मस्के आणि अन्य संयोजक उपस्थित होते. वीन बिलांबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी स्विकारणं सुरु असून शहरात २० ठिकाणी या तक्रारी जमवल्या जात आहेत अशी माहिती यावेळी गवारे यांनी दिली. व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. वीज बिलांच्या दराबाबत मुळात आक्षेप आहे. दिल्लीत वीज दर साडेतीन रुपये एवढा आहे. पण आपल्याकडे साडेतेरा रुपये आहे असं दिनेश गिल्डा म्हणाले.


Comments

Top