HOME   व्हिडिओ न्यूज

नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत

भाजपात आलेल्या शिवाजी पाटील कव्हेकरांचा दावा


लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत, जगभर त्यांनी देशाचं नाव केलं आहे. त्यांच्या काळात कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. असाच उत्तम कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. शेतकरी कर्जमाफी असो, मराठा आरक्षण असो त्यांनी चांगल्या योजना दिल्या. गेल्या साठ वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले नाही. पक्ष सांगेल त्याप्रमाणे प्रचाराच्या कामाला लागणार असं माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सांगितलं. कव्हेकर सपत्नीक, सहकार्‍यांसह भाजपात गेले. अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.


Comments

Top