HOME   व्हिडिओ न्यूज

महाराष्ट्र झाले बेरोजगारीचे केंद्र!

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा आरोप, अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी घेतली सभा


लातूर: महाराष्ट्रात वीज महागली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई सतावत आहे. राज्यात सात सात हजार टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. शेतकरी सामान्यांची स्थिती वाईट आहे. उद्योग बंद पडले. हे राज्य बेरोजगारीचे केंद्र बनले आहे. साक्षरतेचं प्रमाणपत्र बेरोजगारीच्या प्रमाणपत्रात परिवर्तीत झाले असा आरोप कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला. प्रकाशनगरातील प्रचार सभेत ते बोलत होते. विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यात माधवराव सिंधिया यांचं मोठं योगदान होतं असं आ. अमित देशमुख म्हणाले. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला.


Comments

Top