HOME   व्हिडिओ न्यूज

आता निर्माण होतोय प्लास्टीक रस्त्याचा लातूर पॅटर्न

कचर्‍यातलं प्लास्टीक, रस्त्याच्या जबुतीसाठी सगळीकडेच होऊ शकते अनुकरण


लातूर: शिक्षणाचा लातुर पॅटर्न आता राज्यात प्रसिद्ध आहे याच्या जोडीलाच आता प्लास्टिक रस्त्याचा नवा लातू पॅटर्न निर्माण होत आहे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्या वार्डात तेथीलच कचऱ्यातील प्लास्टिक पासून असा रस्ता झालाय. हा रस्ता पाहण्यासाठी प्रभागातील विद्यार्थी ही आले होते. युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर कल्पक नेते म्हणून ओळखले जातातआता हाच प्रयोग संपुर्ण प्रभागात करण्याचा मनोदय त्यानी यावेळी व्यक्त केला. प्रभागातील कचरा गोळा करुन त्याचे वर्गीकरण केले जाते. ओला व सुका कचरा वेगळा केला जातो ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण केले जाते सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक पासून हा रस्ता बनविण्यात आला आहे हे विशेष .या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिशा दाखविणारा प्रयोग केल्याबद्दल अजित पाटील यांचे कौतुक होत आहे. यावेळी प्रभाग १८ च्या नगरसेविका सौ. सरिता राजगिरे, सौ. भाग्यश्री शेळके, संजय गीर,जफर पटेल, भागवत संपत्‍ते, ताहेरभाई शेख, राहुल अंधारे, बालाजी शेळके, भैय्या कांबळे, अमर पाटील, बालु खमामे, हनुमंत काळे, महादेव पिटले, शशिकांत हांडे, सौ. शितल कुलकर्णी, सौ. स्वाती ताई, समीर तांदळे, पंडगे दादा, बोयने शिवाजी, जावेद शेख, आदी वार्डातील नागरीक उपस्थित होते.


Comments

Top