logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   व्हिडिओ न्यूज

मागण्यांसाठी होमगार्ड्सही झाले आक्रमक, काढला मोर्चा

वेतन, भत्ते, नियमांप्रमाणे द्यावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अमलबजावणी करावी

लातूर: अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी लातूर जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सर्वोच्च न्यायालयाने ११/०३/२०१५ रोजी देण्यात आलेल्या निकालाप्रमाणे अमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्रातील होमगार्डांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहेत. प्रत्येकी ०३ वर्षांनंतर होमगार्डस यांच्या पुर्ण नोदणींचे प्रयोजन रद्द करावे. ३६५ दिवसांचे बंदोबस्त देण्याचे प्रयोजन निश्चित करण्यात यावे त्याच सोबत मानधन देण्याचा निर्णय घेण्यात यावा. होमगार्डस यांना कायद्यातील तरतुदीनुसार वेतन, भत्ते, शासनाच्या नियमांप्रमाणे देण्यात यावे. पोलीस प्रशासनातील रिक्त पदे शैक्षणिक पात्रतेच्या आणि अनुभवाच्या आधारे मानसेवी होमगार्डमधून भरुन घेऊन देशभक्तीचा आदर करावा. होमगार्डस समादेशक अधिकारी कार्यालयातील नियमीत लिपीक व शिपायांची नियुक्ती करण्यात याव्यात. होमगार्ड पथकनिहाय स्वतंत्र संगणकीकृत कार्यालये उभारण्यात यावीत. १२ वर्षांनंतर होमगार्डसच्या सेवा समाप्त करणारा निर्णय रद्द करण्यात यावा. वनरक्षक भरतीचे वय पोलीस भरती प्रमाणे करण्यात यावे. पोलीस भरतीचे आरक्षण ५% वरून २० ते २५ ट्क्के करण्यात यावे. होमगार्डसच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी संतोष सुर्यवंशी, अमोल लांडगे, विजय चौधरी, जितेंद्र सातपोते, महेंद्र बनसोडे, अनिल गायकवाड, सरफराज पठाण, गणेश गायकवाड, दत्ता देशमुख, सुभाष होळकर, आनंद सुर्यवंशी उपस्थित होते.


Comments

Top