HOME   व्हिडिओ न्यूज

मला झालेल्या मारहाणीला राजकीय रंग देऊ नका- अख्तर मिस्त्री

नेत्यांच्या बदनामी विरोधात नगरसेवकाने दाखल केली डीवायएसपींकडे तक्रार


लातूर: २५ डिसेंबर रोजी लातूरचे माजी महापौर शेख अख्तर मिस्त्री यांना जबर मारहाण झाली. १५-२० जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत मिस्त्री यांच्या डोक्याला जबर मार लागला अपण आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोद्दार रुग्णालयातून त्यांना समर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान काही मंडळींनी या घटनेला राजकीय रंग देत विशिष्ट पक्षाच्या नेत्याची बदनामी चालवली आहे. यासाठी सोशल मिडियाचा वापर केला जात आहे. लातुरच्या संस्कृतीत न बसणार्‍या या घटनक्रमामुळे संवेदनशील मंडळी चिंतेत आहे. त्यांनी या विरोधात डीवीयएसपी शीलवंत ढवळे यांच्याकडे तक्रार दिली आहे. सोशल माध्यमांच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत असे नगरसेवक युनूस मोमीन यांनी सांगितले.
दरम्यान आम्ही आज अख्तर मिस्त्री यांची भेट घेतली. एकूण प्रकारावर चर्चा केली. मुलांमधले भांडण वाढत गेले, हे पूर्णत: वैयक्तिक प्रकरण आहे. काही राजकीय लोक त्याला रजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृपया मेहेरबानीकरुन असा प्रकार कुणीही करु नये अशी विनंती अख्तर शेख यांनी केली आहे. मारहाणीच्या प्रकरणातील तीन आरोपी सापडले आहेत. बाकी ११ जण बेपत्ता आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Comments

Top