• 20 of March 2018, at 7.23 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

‘आपण सर्वजण’ तर्फे जिजाऊसाहेबांना वंदन, तरुणींचा लक्षणीय सहभाग

गंजगोलाईत जगदंबेची महा आरती, महापौर, उप महापौर अन नगरसेवकही उपस्थित

लातूर: राजमाता जिजाऊसाहेबांचा जन्मदिन सर्वत्र मोठ्या भक्तीभवाने, आदराने आणि आनंदाने साजरा करण्यात आला. आपण सर्वजण या तरुणांच्या ग्रुपने लातुरच्या गंजगोलाईत या निमित्ताने माता जगदंबेची महा आरती करण्यात आली. यात तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. गोपी साठे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात आरतीनंतर जिजाऊंना वंदन करण्यात आले. महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे रागिणी यादव, दिपा गिते, गिता गौड, कांचन अजनीकर, अजित घार, किशन कदम, नेताजी जाधव, महादू रसाळ, उमेश कांबळे यांच्यासह शएकडो तरुण तरुणी यावेळी उपस्थित होते. जगदंबा मंदिराबाहेर जिजाऊंची मोठी प्रतिमा उभारण्यात आली होती. या प्रतिमेला सर्वांनी वंदन केले. तीन बालिकांनी जिजाऊंचा वेश परिधान केला होता. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सहभागी तरुणींनी भगवे फेटे परिधान केले होते. आपाण सर्वजण मध्ये सर्व जातीय, सर्व धर्मीयांचा सहभाग होता. या कार्यक्रमात भगव्या ध्वजाचंअही पूजन करण्यात आलं. प्रत्येक आई जिजाऊ आहे, प्रत्येक मुलगा शिवराय आहे पण त्या आईने आपल्या मुलावर जिजाऊंसारखे संस्कार करायला हवेत असं यावेळी दिपाली चिंचोले या तरुणीने सांगितलं.


Comments

Top