logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   व्हिडिओ न्यूज

यशवंतपुरची लगीनघाई, शेटजींचा फोटो आला की नाही?

कॅमेर्‍यात आलं म्हणून.......रवींद्र जगताप

काल यशवंतपूर रेल्वेगाडी एक वाजता आली. तीन वाजून दहा मिनिटांनी रवाना झाली. या गाडीसोबत आपलाही फोटो यावा यासाठी अनेकजण धडपडत होते. हे धडपडणे साहजिक आहे. लग्नात ज्याप्रमाणे कॅमेरा दिसला की अनेकजण माना उंचावतात तशीच स्थिती होती. पालकमंत्र्यांच्या जवळ आणि त्याच रांगेत सगळ्यांनाच जागा हवी होती. घुसाघुशी चालू होती. एक नगरसेवक मात्र आपल्या जागेवर ठाम उभे होते. अनेकांच्या हातात हिरवे झेंडे असल्यानं उदघाटक कोण असा प्रश्न नवख्या कॅमेरामनला पडावा अशी स्थिती होती. समोरच्या रांगेतले सगळेजण झेंडे हलवत होते पण गाडी काही निघत नव्हती. तेवढ्यात गाडीनं शिट्टी दिली. नगरसेवकाच्या झेंड्याच्या मागे तम्माचा कॅमेरा होता. मध्ये दोघे तिघे होते. नंतर शेटजी आणि बाकीचे होते. शिट्टी वाजल्याबरोबर शेटजी ओरडले एऽऽऽऽ घे खाली, तम्मा आला का फोटो?......शेटजीचं हे वागणं चुकीचं होतं असं नव्हे. एवढा आटापिटा करायचा अन नेमक्या वेळेला दुसर्‍यावरच कॅमेरा चमकायचा. याच्याएवढं दु:ख कोणतं असेल?


Comments

Top