HOME   व्हिडिओ न्यूज

जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दंगली घडवतात- सुषमा अंधारे


लातूर: महत्वाच्या प्रश्नांवरुन जनतेचं लक्ष दुसरीकडं वळवण्यासाठी राज्यकर्ते दंगली घडवून आणतात असा आरोप विचारवंत, प्रसिद्ध वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांनी केला. आंबेडकर चौकात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
एक जानेवारीला बाबासाहेबांना वंदन करायचा दिवस, एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस. आपण या दिवशी काय करीत होतो? एकमेकांना चौकशी करीत होतो. भिमा कोरेगावला गेला होता का रे? सुरक्षित आहेस का रे? तीन जानेवारीला सावित्री मातेला वंदन करण्याचा दिवस. पण त्या दिवशीही रस्त्यावर उतरावं लागलं. २८३२९ पोरांवर खटले दाखल झाले. मिलींद एकबोटे, संभाजी भिडेंवर आम्ही एफआयआर दाखल केले. आरोपींना अटक करण्याऐवजी न्याय मागायला आलेल्या तरुणांवर खटले दाखल केले गेले. यासाठी सीसीटीव्हीच्या फुटेजचा हवाला देण्यात आला. ज्या गावात एसटी पोचत नाही त्या गावात सीसीटीव्ही कुठून आले? असा प्रश्न करीत महत्वाच्या विषयांवरील जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दंगली घडवल्या जातात असा आरोप डॉ. अंधारे यांनी केला. कार्यक्रमाचे अद्यक्षपद रिपाइं नेते चंद्रकांत चिकटे यांनी भूषवले होते. डॉ. अंधारे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.


Comments

Top