HOME   व्हिडिओ न्यूज

शौचालय रस्त्यावर, तक्रारकर्ता रुग्णालयात, होळीचा प्रकार

रस्त्यावरच्या शौचालयामुळे गावाची अडचण, अनेकांकडे तक्रार करुनही दखल घेईनात


लातूर: औसा तालुक्यातील होळी या गावी एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या घरासमोर रस्त्यावरच शौचालय बांधल्याने गावकर्‍यांची अडचण होत आहे. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने हरिश्चंद्र पाटील यांनी गावातच उपोषण सुरु केले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. छबुबाई यादव असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून त्या कुणालाही दाद देत नाहीत. पाटील यांनी आतापर्यंत सरपंच, ग्रामसेवक, बीडीओ, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना विनंती अर्ज दिले आहेत. याचा कसलाच उपयोग होत नसल्याचे पाटील सांगतात. पाटील यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत.


Comments

Top