HOME   व्हिडिओ न्यूज

सगळ्या प्रगतीचा जन्मदाता शिक्षक- कवीश्रेष्ठ ना. धों महानोर

अनेक क्षेत्रातली मोठी माणसं खेड्यातून आलेली आहेत!


लातूर: आज विविध क्षेत्रात नाव कमावलेली मोठी माणसं बहुतांश खेड्यातून आलेली आहेत. शिक्षणातूनच मोठी झाली आहेत. या सगळ्या प्रगतीचा खरा जन्मदाता शिक्षक आहे. आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विचार कवीश्रेष्ठ ना. धों. महानोर यांनी मांडले. ते देशीकेंद्र शाळेत आयोजित ‘कवी भेट’ या कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अण्णाराव पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांतही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणाले होते याचा अर्थ खेड्याचं दु:ख पहा, शेतीचं पहा, शेतकर्‍याचं पहा असा होता. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता, त्यांनी लावलेल्या बिजांचे आज वटवृक्ष झाले आहेत. हेच परिवर्तन आहे. आज संशोधनात, नाटकात, चित्रपटात, व्यवसायात मोठी झालेली बहुतांश माणसं खेड्यातून आलेली आहेत त्यांचा महाराष्ट्राने अभिमान बाळगला पाहिजे या सगळ्या प्रगतीचा खरा जन्मदाता शिक्षक आहे असंही महानोर म्हणाले. या कार्यक्रमात महानोर यांनी एका विद्यार्थीनीच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं. या विद्यार्थीनीने कविताही सादर केली.


Comments

Top