HOME   महत्वाच्या घडामोडी

८५७ अश्लील साईट्स बंद, पवार-ठाकरे एकाच हॉटेलात अन विमानात, ऊसतोड कामगारांना पाच टक्के दरवाढ, हजामतीच्या दरात वाढ, मोदीची २५० कोटींची संपत्ती जप्त......२६ ऑक्टोबर २०१८

८५७ अश्लील साईट्स बंद, पवार-ठाकरे एकाच हॉटेलात अन विमानात, ऊसतोड कामगारांना पाच टक्के दरवाढ, हजामतीच्या दरात वाढ, मोदीची २५० कोटींची संपत्ती जप्त......२६ ऑक्टोबर २०१८

* राज ठाकरे आणि शरद पवार औरंगाबादेत एकाच हॉटेलात, मुंबईपर्यंतचा विमान प्रवासही एकत्र
* सेनेने काँग्रेसला मदत होईल असे वागू नये, भाजपसोबतच युती करावी- चंद्रकांत पाटील
* युतीत ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील
* ऊसतोड कामगारांच्या मजुरीत पाच टक्के दरवाढ
* सूरतव्या हिरे व्यापार्‍याने कर्मचार्‍यांना दिल्या ६०० कार भेट
* ८५७ अश्लील साईट्स बंद करण्याचे आदेश
* पेट्रोल २५ पैशांनी तर डिझेल ०८ पैशांनी स्वस्त
* ऊसाला पहिला हप्ता ३५०० द्या, सांगलीत आंदोलन
* पाण्याअभावी परळीतील वीज निर्मिती बंद पडण्याची शक्यता
* राज्यात दुष्काळ जाहीर करायचा की नाही? यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णय- राज्य सरकार उच्च न्यायालयात
* १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती, काही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल येणे बाकी
* औरंगाबाद लोकसभा जागेवर राष्ट्रवादी दावा करणार- शरद पवार
* जागा वाटपाच्या चर्चेत मी नसतो, प्रदेशाध्यक्ष आणि काही नेत्यांवर बोलणीची जबाबदारी, ५० टक्के जागांसाठी आग्रह- शरद पवार
* निवडणुकांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊ नका- राज्यपाल
* एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनस आणि पगार मिळणार ०१ नोव्हेंबरला
* बोट दुर्घटनेतील दोषींवर होणार कारवाई, फास्ट ट्रॅक चौकशी होणार- गृहराज्यमंत्री दीपक केसरकर
* शिवस्मारक भूमिपूजन बोट दुर्घटना आयोजनातील गोंधळामुळे, मार्ग बदलल्याने खडकाळ भागात बोट गेली- मच्छिमार नेते, दामोदर तांडेल
* शिवस्मारकाचे ठिकाणच चुकीचे, आसपासचा १५ हेक्टरचा भाग खडकाळ- दामोदर तांडेल
* खाजगी दूरचित्रवाहिन्यां, एफ एम रेडिओवर विविध सरकारी योजनांचा 'प्रचार' करण्यासाठी पाच कोटी खर्चास राज्य सामान्य प्रशासनाची मंजुरी
* संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन २७ व २८ ऑक्टोबर रोजी अलिबागला, हार्दिक पटेल निमंत्रित
* पुण्यात कटिंग व दाढीच्या दरात वाढ, मोजावे लागणार कटिंगसाठी १०० रुपये, तर दाढीसाठी ५० रुपये
* नगर तालुक्यात बिरोबा देवस्थानात झालेल्या होईक (भविष्यवाणी) कार्यक्रमात पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचे भाकित
* जिल्ह्यात संघाच्या शाखा, स्वयंसेवक वाढवा, कामाच्या माध्यमातून जनतेची सेवा करा, हिंदूनो संघटित व्हा- सरसंघचालक
* देशातील ५० टक्के किशोरवयीन मुलींना अॅनिमिया- सर्वेक्षण
* सीबीआय प्रमुखांना हटवल्याचा निषेध म्हणून काँग्रेसची आज देशभरातील सीबीआय कार्यालयाबाहेर निदर्शने
* सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या खंडपीठात आज सीबीआय संचालक आलोक वर्मांच्या याचिकेवर सुनावणी
* सीबीआय संचालकांना मध्यरात्री हटवणे घटनाबाह्य, अंबानींना वाचवण्यासाठी सीबीआय संचालकांवर कारवाई- राहुल गांधी
* आलोक वर्माच सीबीआयचे संचालक, सध्या फक्त रजेवर पाठवलंय- सीबीआयचे स्पष्टीकरण
* २८ आणि २९ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर
* २०३० पर्यंत भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल
* वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डींवर विशाखापट्टणम विमानतळावर चाकू हल्ला
* नीरव मोदीची हाँगकाँगमधील २५० कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
* वित्तीय बाजारात रोकडची चणचण, सणासुदीत रोख रकमेची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होण्याची शक्यता
* भारताची मीनाक्षी चौधरी 'मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८' ची उपविजेती, पॅराग्वेची क्लारा सोसा विजेती


Comments

Top