HOME   महत्वाच्या घडामोडी

पन्नास लाखांचा घोडा, फटाक्यांमुळे पक्षा-प्राणी जखमी, लष्करात दोन तोफा दाखल, बातम्या देणारा रोबोट, चार टीएमसी पाणी गायब, महालक्ष्मीचा किरणोत्सव.......१० नोव्हेंबर २०१८

पन्नास लाखांचा घोडा, फटाक्यांमुळे पक्षा-प्राणी जखमी, लष्करात दोन तोफा दाखल, बातम्या देणारा रोबोट, चार टीएमसी पाणी गायब, महालक्ष्मीचा किरणोत्सव.......१० नोव्हेंबर २०१८

* अकलूजमध्ये घोडे बाजार भरला, पन्नास लाख रुपयांहून अधिक किमती
* नोटाबंदी विरोधात कॅंग्रेसने केली देशभर निदर्शने
* मुंबईत फटाक्यांमुळे अनेक पक्षी आणि प्राणी जखमी
* दोन शक्तीशाली तोफा लष्करात दाखल
* नागपुरात भरदिवसा रिक्षाचालकाची हत्या
* बीडमध्ये पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने घेतला गळफास
* ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
* नोटबंदीला रिझर्व बॅंकेने चार तास आधी घेतला होता आक्षेप
* यंदा देशभरात फटाक्यांची विक्री रोडावली, ५० टक्के खरेदीमुळे प्रदूषण कमी
* पेट्रोल आणि डिझेल १७ पैशांनी स्वस्त
* स्वस्ताईचा २४ वा दिवस
* मध्यप्रदेशात प्रचारादरम्यान मंच कोसळला
* फ्रान्समध्ये उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू तेथील भारतीयांची घेतली भेट
* नायडू यांनी आंध्र आणि तामिळनाडूत भाजपविरोधी मोट बांधण्याची केली सुरुवात
* चीनने तयार केला टीव्हीवर बातम्या देणारा रोबोट वृत्त निवेदक
* नागपुरात सैन्य दलाच्या गुप्तचरांनी केली दोघांना अटक, आयएसआयशी संबंध असल्याचा संशय
* जायकवाडीत नऊ पैकी केवळ पाच टीएमसी पोचले, चार टीएमसी पाणी गेले कुठे?
* सरकार चारा छावण्या उभारणार नाही, थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील- महादेव जानकर
* कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात पार पडला किरणोत्सव
* अवनी वाघिण मृत्यूच्या चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची समिती
* वाघिणीला ठार करण्यात वनमंत्री मुनगंटीवार यांची कुठलीही चूक नाही त्यांचा राजीनामा मागणे अयोग्य- नितीन गडकरी
* लॉटरी हा जुगार-सट्टेबाजीचाच प्रकार, तिकिटांवर कर आकारण्याचा निर्णय योग्यच- उच्च न्यायालय
* केंद्राने निश्चित केलेली एफआरपी न देणार्‍या साखर कारखान्यांवर होणार कारवाई- चंद्रकांत पाटील
* भाजप आणि शिवसेनेची युती निश्चित होईल- रावसाहेब दानवे
* राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा एकाचवेळी करा- शिवसेना, लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या ९५ जागांबाबत तिढा
* पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर युतीवर शिक्कामोर्तब, १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल- चंद्रकांत पाटील
* नोटाबंदीचा निर्णय ही संघटीत लूट, नागरिक नरेंद्र मोदी आणि अमित शहांना राजकारणातून कायमचे तडीपार करतील- संजय निरुपम
* बीडमध्ये एकाच घरातील तिघांचे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
* चंद्रपूर जिल्ह्यात शेतमजुराचा विषारी कीटकनाशक फवारणीनंतर मृत्यू
* पुरंदर तालुक्यात बिबट्याला पकडताना दोन कर्मचारी जखमी
* पुण्यात लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा ०७ लाखाचा ऐवज लंपास
* मुंबईत कॉफीमध्ये नशेचे पेय टाकून तरुणीवर बलात्कार करणारा गजाआड, तरुणीचे अश्लील फोटो मित्रांना पाठविल्याचे उघड
* पिंपरीत लहान भावाचे लग्न आणि कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्याला अटक
* शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
* सीबीआयची आजपासून तीन दिवस आर्ट ऑफ लिव्हिंगची कार्यशाळा, दीडशे अधिकारी होणार सहभागी
* जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दहा ठिकाणी होणार उड्डाणपूल
* शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी तयार केल्या प्रतिकात्मक विटा
* छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
* ममता बॅनर्जींना भारतरत्न द्या - तृणमूलचे इद्रिस अली
* श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी केली संसद बरखास्त
* टी२० विश्वचषक स्पर्धा- भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या संघाचा ३४ धावांनी केला पराभव


Comments

Top