HOME   महत्वाच्या घडामोडी

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, देश भाजपमुक्त करायचा नाही- राहूल गांधी......१२ डिसेंबर २०१८

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, देश भाजपमुक्त करायचा नाही- राहूल गांधी......१२ डिसेंबर २०१८

* मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा, सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही
* कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा
* मध्यप्रदेशात चार अपक्ष आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात
* मध्यप्रदेशात कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांकडे मागितली वेळ
* मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात, भाजपाचा दावा
* मध्यप्रदेशात कॉंग्रेस सत्तेपासून केवळ दोन जागा मागे, घोडेबाजार अटळ
* मध्यप्रदेशात कॉंग्रेस ११४, भाजपाला मिळाल्या १०९ जागा
* तेलंगणातात टीआरसला एकहाती सत्ता
* मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने खेचून घेतली सत्ता
* महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
* संसदेचं अधिवेशन आजपासून सुरु
* गोव्यात मुख्यमंत्री बदलीच्या मागणीला जोर
* निवडणूक निकाल प्रतिक्रिया:
* काँग्रेसमुक्त भारताचे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली- शिवसेना
* या राज्यांतील जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला, जनतेने जे नको ते मुळापासून उखडले, जनतेने हवेत उडणाऱ्यांना उतरवले जमिनीवर- शिवसेना
* धर्माच्या मुद्द्यावरून भाजपसोबत राहणार, भाजपनं मित्रपक्षाला कमी लेखल्याचा परिणाम, जनतेने भाजपला धडा शिकवला- शिवसेना
* लोकांचा जातीयवादी शक्तींवर विश्वास नाही, त्यांना शांतता आणि प्रगती हवी हेच निकालांवरून होते स्पष्ट- शरद पवार
* जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, काँग्रेसचं अभिनंदन- नरेंद्र मोदी, भाजप कार्यकर्त्यांचे मानले आभार
* निकालाचा परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर होणार नाही- रामदास आठवले
* रोजगार, शेतकरी, भ्रष्टाचारविरुद्ध लढू, आम्ही भाजपला हरवू, पण देश भाजपमुक्त करणार नाही- राहुल गांधी
* कर्जमाफी हे एक सहाय्यभूत पाऊल, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्याचसोबत काम करावे लागेल- राहुल गांधी
* जनता मोदींच्या कारभाराबाबत असंतुष्ट असल्याचा संदेशच मिळाला- राहुल गांधी
* मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे तसेच कठीण काळात मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे राहुल गांधींनी मानले आभार
* थापेबाजी जास्त दिवस चालत नाही, ही लोकसभा निवडणुकीची नांदी- राज ठाकरे
* भाजपवर ही वेळ येणारच होती, नरेंद्र मोदी, अमित शहांच्या मुजोर भाषेला जनतेने उत्तर दिलं- राज ठाकरे
* पाच राज्यांच्या निकालातून भाजपचा प्रभाव ओसरल्याचे चित्र - रजनीकांत
* हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय- अशोक चव्हाण
* २०१९ च्या निवडणुकीतही जनतेचा हाच कल राहणार- पृथ्वीराज चव्हाण
* काँग्रेस आणि जनतेच्या पाच वर्षांच्या संघर्षाला यश, राजस्थान मुख्यमंत्री निर्णयाबाबत हायकमांड निर्णय घेतील- सचिन पायलट
* देशात जनादेश बदलत असल्याचे संकेत- ज्योतिरादित्य सिंधिया
* छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचा राजीनामा
* मध्यप्रदेशात सपा काँग्रेसला देणार पाठिंबा
* तेलंगणात एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी
* राहुल गांधी यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातली पूजा
* भाजपचा बलस्थानी राज्यांतच पराभव, नरेंद्र मोदी, अमित शहांपुढली राजकीय आव्हाने झाली अवघड
* राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना मिळणार कंत्राटी तत्त्वावर नोकरी
* राम शिंदे यांची छावण्यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल केल्या प्रकरणी नगरमध्ये पत्रकाराला धमकी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
* उत्पादनात त्रुटी आढळल्याने लोणावळ्याची प्रसिद्ध मगनलाल चिक्कीचे उत्पादन न करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आदेश
* अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हायकोर्टाबाहेर हल्ला करणारा वैजनाथ पाटीलला जामीन
* बजाज फायनान्सच्या ग्राहकांचा डेटा चोरून त्यांच्या नावाने कर्ज घेणाऱ्या तिघांना पकडले मुंबईच्या पोलिसांनी
* घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी बारबालेसह दोघांना अटक, अटक आरोपींची संख्या झाली ०६
* पुण्यात थंडीचा कडाका, निचांकी तापमान गेले ०९.५ अंश सेल्सिअसवर
* गिरगाव चौपाटीवर १६ डिसेंबरला प्रभू येशू जन्मोत्सव साजरा करण्यासाठी २५ हजार चौ. मी. जागा वापरण्यास हायकोर्टाचा नकार
* नाशिकमध्ये गोदावरी काठी उभारला प्लास्टिकचा १०० फुटी राक्षस, 'प्लास्टिक मुक्त भारत'चा संदेश
* माजी आर्थिक सचिव शक्तिकांत दास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर
* बलात्कार किंवा लैंगिक छळ झालेल्या स्रीची ओळख जाहीर करु नका- सर्वोच्च न्यायालयाचे पोलिस आणि प्रसारमाध्यमांना आदेश
* मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने पीडितेची ओळख कोणत्याही प्रकारे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाहीर करू नये
* जनहिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विरोधकांना आवाहन
* पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' या पर्यायाला समाजवादी, आम आदमी पार्टी पेक्षा अधिक मते
* पैसा आणि सत्तेची ताकद असलेल्या भाजपचे वर्चस्व काँग्रेसने मोडीत काढल्याने बदलणार राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे
* धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान, चीन आणि सौदी अरेबिया यांचा अमेरिकेने केला काळ्या यादीत समावेश
* न्यूयॉर्कमध्ये नऊ वर्षांपूर्वी टॉयलेटमध्ये 'फ्लश' झालेली मौल्यवान अंगठी मिळाली महिलेला
* बोस्टवाना येथील सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला ०५ सुवर्ण तर ०१ रौप्य, ४४ देशांतील २५० विद्यार्थ्यांचा सहभाग


Comments

Top