HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर कोर्टाला मिळाली रेस्ट हाऊसची जागा, १२ वर्षात तेरावी बदली, पवारांचा लोकल प्रवास, राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा, खलिस्तान लिबरेशनवर बंदी, एमआयएम सोबतच राहणार, चोरांची झोप उडाली......२८ डिसेंबर २०१८

लातूर कोर्टाला मिळाली रेस्ट हाऊसची जागा, १२ वर्षात तेरावी बदली, पवारांचा लोकल प्रवास, राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा, खलिस्तान लिबरेशनवर बंदी, एमआयएम सोबतच राहणार, चोरांची झोप उडाली......२८ डिसेंबर २०१८

* लातुरातील शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करा, अन्यथा नेत्यांना हार घालू देणार नाही: मराठा क्रांती मोर्चा
* अशोक हॉटेल चौकातील जुन्या विश्रामगृहाच्या जागेचा ताबा मिळाला लातुरच्या न्यायालयाला
* विखुरलेल्या न्यायालयांना मिळणार याच ठिकाणी जागा, पक्षकार आणि वकिलाचीही सोय
* न्यायालयाला नवी जागा मिळाल्याने बाहेरगावहून येणार्‍यांना मिळणार आधार
* सातवा वेतन आयोग लागू करा अन्यथा काम बंद आंदोलन- लातूर मनपा कर्मचार्‍यांचा इशारा
* लातूर, बीड आणि उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा ०७ जानेवारीला लातुरात मेळावा
* चिचिध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढला लातुरत मोर्चा
* तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर
* राज्यात सर्वाधिक कमी तापमान निफाडमध्ये, १.८ सेल्सियस
* मुंबईच्या चेंबूरमध्ये आग, पाचजणांचा मृत्यू
* तुकाराम मुंडे यांची पुन्हा एड्स नियंत्रक मंडळाच्या प्रकल्प संचालकपदी बदली, १२ वर्षात १३ वी बदली
* सातव्या वेतन आयोगाला मंत्रीमंडळाची मंजुरी
* अजित पवार यांनी केला डोंबिवलीपर्यंत लोकल रेल्वेने प्रवास
* ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट वादात ‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ या संवादाला आक्षेप
* खलिस्तान लिबरेशन फोर्स या संघटनेवर केंद्राची बंदी
* लोधी समाजानेही मागितले आरक्षण, यवतमाळमध्ये काढण्यात आला मोर्चा
* राज्यात लोकायुक्त नियुक्त न करण्याचे कारण काय?- अण्णा हजारे
* राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा १० जानेवारीपासून होणार सुरु, महाडच्या चवदार तळ्यावर पहिली सभा
* नववर्षानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे बाजारपेठा २४ तास सुरू ठेवा- आदित्य ठाकरे
* मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील गुन्ह्याची फेरचौकशी होईल- गृह राज्यमंत्री दीपक केसरकर
* केबलच्या नवीन नियमावली अंमलबजावणीस ०१ महिन्याची मुदतवाढ, केबलचालकांचे आंदोलन राहणार चालूच
* भाजपा हार्ड तर काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी, दोघेही एकाच माळेचे मणी – प्रकाश आंबेडकर
* एमआयएमसोबतची युती तुटणार नाही- प्रकाश आंबेडकर
* काँग्रेससोबत युती न झाल्यास आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन राज्यात तिसरा पर्याय देऊ- प्रकाश आंबेडकर
* आकांक्षा देशमुखच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे- राज्य महिला आयोग
* उत्तरेच्या दिशेने वाहत असलेल्या अतिथंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट
* मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केला बदल, बिल्डरांना ०१ लाख कोटीहून अधिक लाभ- राधाकृष्ण विखे पाटील
* घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने १० हजार कोटींची ‘डिल’ केली, ०५ हजार कोटींचा पहिला हप्ता पोचलाही- राधाकृष्ण विखे पाटील
* विखे-पाटील यांचे आरोप बिनबुडाचे, आरोप सिद्ध करावेत, बिनशर्त माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू- मुख्यमंत्री
* महाराष्ट्रातील खासदारांसोबत ०२ जानेवारीला नरेंद्र मोदींची बैठक
* २५ जानेवारीला 'ठाकरे' वगळता कुठलाही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- चित्रपट सेनेचा इशारा
* पुणे येथे ०१ कोटी ७० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी वकिलाला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
* ९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात
* गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देऊ नये- कविता लंकेश
* राफेल खरेदीचा घोटाळा प्रकरणी नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट करा- काँग्रेस
* आयएसच्या संशयित दहशतवाद्यांची एनआयए कोठडीत रवानगी, संशयितांना कुटुंबियांना भेटण्यास न्यायालयाची परवानी
* विधेयक सुधारणांवरील मतदानावर काँग्रेस, एआयएडीएमकेसह अनेक पक्षांचा बहिष्कार टाकत सभात्याग
* तिहेरी तलाक विधेयकाला नाही, तर पद्धतीला विरोध, विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवा- खासदार सुप्रिया सुळे
* राम मंदिर निर्माण राजकीय मुद्दा नसून ती जनभावना, हा संविधानाचा अपमान- खा. अरविंद सावंत
* बंगळुरू येथे नववर्ष साजरं करणाऱ्यांना बजरंग दलाकडून धमक्या
* लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाक विधेयक संविधानविरोधी- मल्लिकार्जुन खरगे
* तिहेरी तलाक विधेयक आमच्या समाजाविरोधात, त्यामुळे याला पाठिंबा नाही- एआयडीमके नेता अनवर राजा
* तिहेरी तलाक विधेयक मुस्लीम महिलांना रस्त्यावर आणणारे, त्यांना उद्ध्वस्त आणि कमकुवत करणारे- असदुद्दीन ओवेसी
* छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळातील १२ मंत्री कोट्याधीश, सर्व मंत्र्यांची एकूण संपत्ती ४७.१३ कोटी
* चौकीदार झोपत नाही म्हणून चोरांची झोप उडाली- नरेंद्र मोदी
* माझ्या वक्तव्यानंतर मी ट्रोल्सच्या निशाण्यावर, पण ट्रोल्स मला रोखू शकत नाहीत, मला राग आलाय, पण मी घाबरलेलो नाही- नसिरुद्दीन शहा
* अॅपलचे आयफोन 'मेक इन इंडिया'अंतर्गत तयार होणार भारतातच, तामिळनाडूतील प्रकल्पात २५ हजार रोजगार संधी
* उत्तर प्रदेशात ०७ वी तल्या मुलीने शाळेची फी भरण्याचा केला हट्ट, रागावलेल्या वडिलांनी मुलीची केली हत्या, वडील, मामा गजाआड
* कर्नाटकात शेतकरी कुटुंबानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आत्महत्या करण्याची मागितली परवानगी
* अनुपम खेर यांची भूमिका असलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमात काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका, सिनेमाला काँग्रेसचा विरोध


Comments

Top