HOME   महत्वाच्या घडामोडी

आझादांच्या लातूर सभेला परवानगी नाकारली, राफेल प्रकरण लोक विसरणार नाहीत, राम मंदीर कायद्यानेच, कर्जबुडव्यांना भारतात आणणार, भाजपा खासदारांची बैठक.......०२ जानेवारी २०१९

आझादांच्या लातूर सभेला परवानगी नाकारली, राफेल प्रकरण लोक विसरणार नाहीत, राम मंदीर कायद्यानेच, कर्जबुडव्यांना भारतात आणणार, भाजपा खासदारांची बैठक.......०२ जानेवारी २०१९

* चंद्रशेखर आझाद यांच्या लातुरच्या सभेला पोलिसांनी नाकारली परवानगी
* काहीही झाले तरी सभा घेणारच लातुरच्या युवा भीम सेनेचा निर्धार
* ऑगस्टा प्रकरणी सोनियांचं नाव आल्यानं राफेल घोटाळा विसरणार नाही- शिवसेना
* घटनात्मक पद्धतीनेच राम मंदिराचा निर्णय होईल- पंतप्रधान
* हिंमत असेल तर शरद पवार आणि स्वतंत्र लढून दाखवावए- चंद्रकांत पाटील
* ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलिसांनी केली १० हजार जणांची तपासणी, ४५० जणांवर कारवाई
* इतरांना भाजप-सेनेशी एकतर येऊन लढावं लागतं, यातच आमचे यश- चंद्रकांत पाटील
* विमान इंधना १४.७ रुपयांनी कपात
* विदेशी दारुच्या किमतीत वाढ
* बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार मश्रफे शेख हसिना यांच्या पक्षातून झाला विजयी
* लघु आणि मध्यम उद्योगांना रिझर्व बॅंकेकडून सवलती
* भैय्युजी महाराज यांना फोनवरुन त्रास देणार्‍या तरुणीची चौकशी, रहस्य उलगडणार
* कर्ज बुडवून पळून जाणार्‍यांना भारताता परत आणणारच- पंतप्रधान मोदी
* अहमदनगरच्या लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा, युती न झाल्यास शिवसेनाही स्वतंत्रपणे लढणार
* महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची आज अमित शाह यांनी बोलावली बैठक
* एफआरपी न देणारे कारखाने जप्त करावेत- खा. राजू शेट्टी
* मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजातील नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या- शरद पवार
* नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी
* सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना २०१९ आधी घेरण्याचा हा प्रकार- शिवसेना
* सत्ता सोडल्यास राष्ट्रवादी जागा घेईल म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही, नगरमधील महापौर निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब - रामदास कदम
* राम मंदिरासाठी कायदा करावा- संघाची ठाम भूमिका
* शबरीमलात महिला प्रवेश समर्थनार्थ मुंबईत महिलांचे मानवी साखळी आंदोलन
* मोबाईलवर चॅट करते म्हणून मुंबईत विरारमध्ये पित्याने जाळले १६ वर्षांच्या मुलीला
* राम मंदिर आश्वासनामुळेच सत्तेवर आलात, जाहीरनाम्यात होते मंदिरासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु - संघाने दिली मोदींना आठवण
* कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादचं नामांतर प्रयागराज करण्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब
* फोडाफोडीचे राजकारण करणे बुद्धीला पटणारे नसल्यामु‌ळे आम्ही विरोधात बसणे पसंत केले- मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान
* पाच राज्यातील अपयशावर आमचे चिंतन सुरु, भाजप लोकशाही मानणारा पक्ष - पंतप्रधान
* नोटाबंदी जनतेसाठी 'झटका' नव्हता, आम्ही लोकांना आधीच सावध केले होते- पंतप्रधान
* उर्जित पटेल यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता- पंतप्रधान
* ०३ जानेवारीला पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ०२ सभा
* सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शाह यांना अडकवण्यात काँग्रेसचा हात- स्मृती इराणी
* झारखंडमध्ये नरेंद्र मोदी यांची शनिवारी जाहीर सभा, सभेत काळे कपडे आणि काळ्या वस्तुला बंदी
* मध्य प्रदेशमध्ये ‘वंदे मातरम’ काँग्रेसने केले बंद, भाजपच्या काळात दर महिन्याला पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयांत वंदे मातरम म्हणणे होते बंधकारक
* जीएसटीच्या महसुलात डिसेंबरमध्ये घट, मिळाले ९४ हजार ७२६ कोटी, नोव्हेंबरच्या तुलनेत ०३ हजार कोटीची * घट
* 'नासा'च्या 'न्यू होरायझन' यानाची सूर्यमालेला गवसणी


Comments

Top